युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान उद्या चेन्नईमध्ये 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या प्रारंभाची घोषणा करणार


भारतात प्रथमच बुद्धिबळ ऑलिम्पियाड आयोजित केले जाणार; भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा संघ स्पर्धेत उतरणार

Posted On: 27 JUL 2022 8:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जुलै 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या चेन्नईच्या जेएलएन इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या  भव्य उद्घाटन समारंभात 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या प्रारंभाची  घोषणा करतील. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर देखल या कार्यक्रमात सहभागी होतील.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001T5W0.jpg

पंतप्रधानांनी नवी दिल्ली इथल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय स्टेडीयममध्ये जून 19, 2022 रोजी पहिल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशाल रिलेचा शुभारंभही केला होता. या मशालीने 40 दिवसांच्या कालावधीत सुमारे 20,000 किलोमीटरचा प्रवास करून देशातील 75 महत्वाच्या ठिकाणी भेट दिली असून स्वित्झर्लंड येथील फिडे मुख्यालयाकडे जाण्यापूर्वी तिचा प्रवास महाबलीपुरम येथे पूर्ण झाला होता.

   https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002LIDN.jpg

44 वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड चेन्नई येथे 28 जुलै ते 9 ऑगस्ट 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. 1927 पासून आयोजित करण्यात येत असलेली ही प्रतिष्ठेची स्पर्धा भारतात प्रथमच तर आशिया खंडात 30 वर्षांनंतर आयोजित केली जात आहे. 187 देश या स्पर्धेत सहभागी होत असून कोणत्याही बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील हा सर्वात मोठा सहभाग असेल. भारत देखील 6 संघांमधील 30 खेळाडूंसह आपला आतापर्यंतचा सर्वात मोठा संघ स्पर्धेत उतरवत आहे.


* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1845646) Visitor Counter : 171