आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 202.50 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वयोगटातील 3.85 कोटींपेक्षा जास्त किशोरवयीनांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,47,512

गेल्या 24 तासात 14,830 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.47%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 4.53%

Posted On: 26 JUL 2022 9:31AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 202.50 (2,02,50,57,717) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,67,49,821 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.85 (3,85,97,478) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीनांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10411218

2nd Dose

10086920

Precaution Dose

6199396

FLWs

1st Dose

18429580

2nd Dose

17665413

Precaution Dose

11908529

Age Group 12-14 years

1st Dose

38597478

2nd Dose

27210993

Age Group 15-18 years

1st Dose

61043195

2nd Dose

50671660

Age Group 18-44 years

1st Dose

559307162

2nd Dose

507827011

Precaution Dose

15717551

Age Group 45-59 years

1st Dose

203648803

2nd Dose

195059205

Precaution Dose

11158986

Over 60 years

1st Dose

127416102

2nd Dose

121892269

Precaution Dose

30806246

Precaution Dose

7,57,90,708

Total

2,02,50,57,717

 

भारतातील रुग्णसंख्या सध्या 1,47,512 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.34% इतकी आहे.

 

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.47%. झाला आहे. 

गेल्या 24 तासात 18,159 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,32,46,829 झाली आहे. 

 

गेल्या 24 तासात 14,830 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 

गेल्या 24 तासात एकूण 4,26,102 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 87.31 (87,31,85,917) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.53% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 3.48% आहे. 

****

ST/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1844869) Visitor Counter : 176