संरक्षण मंत्रालय

भारताकडे दुष्ट हेतूने पाहण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणापासूनही जनतेचे संरक्षण करण्यासाठी भारत हा एक शक्तिशाली आणि आत्मविश्वास असलेला सुसज्ज देश बनला आहे- संरक्षण मंत्री राजनाथ सिंग


जम्मू येथे राजनाथ सिंग यांनी आज कारगिल विजय दिवस कार्यक्रम केला साजरा

Posted On: 24 JUL 2022 4:56PM by PIB Mumbai

 

भारताकडे दुष्ट नजरेने पाहायचा प्रयत्न करणाऱ्या कोणापासूनही जनतेचे संरक्षण करण्यासाठी भारत हा एक शक्तिशाली आणि आत्मविश्वास असलेला सुसज्ज देश बनला आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे. जम्मू येथे आज कारगिल विजय दिवस साजरा करणाऱ्या कार्यक्रमात ते बोलत होते. देशाची सेवा करताना स्वातंत्र्यापासून ज्या सैनिकांनी आणि सशस्त्रदलातील जवानांनी प्राणाची आहुती दिली त्या सगळ्यांना त्यांनी आदरांजली वाहिली. ज्या मूल्यांमुळे देशाची एकता आणि अखंडता सुरक्षित ठेवता आली त्या मूल्यांचा गाभा देशाभिमानाची भावना असल्याचे त्यांनी सांगितले.

आमचे प्राधान्य संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता प्राप्त करणे आहे कारण ते राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी आणि एक मजबूत सुरक्षा यंत्रणा विकसित करण्यासाठी केंद्रस्थानी आहे. ही दृष्टी साकार करण्यासाठी देशांतर्गत संरक्षण उपकरणांच्या खरेदीसाठी 68% संरक्षण बजेट राखून ठेवण्यात आले आहे

मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्डदृष्टीकोन ठेवत निव्वळ आयातदारापासून, आम्ही आता निव्वळ निर्यातदार झालो आहोत त्यामुळे आमच्या स्वतःच्या गरजा पूर्ण होत आहेतच परंतु आमच्या मित्र देशांच्या गरजा देखील पूर्ण करत आहोत असे त्यांनी सांगितले.

सरकारने नुकत्याच केलेल्या उपाययोजनांमुळे भारत आज संरक्षण क्षेत्रातील जगातील अव्वल 25 निर्यातदारांपैकी एक आहे. 2025 पर्यंत 35,000 कोटी रुपयांची निर्यात करण्याचे लक्ष्य ठेवले आहे आणि आगामी काळात भारत एक अव्वल निर्यातदार बनेल. भारताला जागतिक महासत्ता बनवण्याचा आमचा उद्देश आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

अनेक आव्हाने आणि आंतरराष्ट्रीय दबाव असूनही कारगिल युद्धादरम्यान सशस्त्र दलातील जवानांसाठी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी वापरलेले प्रोत्साहनाचे शब्द  आणि त्यांच्या नेतृत्वाबद्दल राजनाथ सिंह यांनी गौरवोद्गार काढले.

कसोटीच्या काळात देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता राखण्यासाठी तिन्ही दलांमधील संयुक्तता आणि त्यांचा सरकारशी असलेला समन्वय याचे हा विजय हे एक प्रमुख उदाहरण आहे असे राजनाथ सिंग यांनी सांगितले. पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तानवर पाकिस्तानने बेकायदेशीर कब्जा केला आहे.

हे भाग मुक्त करण्याचा ठराव भारतीय संसदेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. परमवीर चक्र पुरस्कार विजेते कॅप्टन बाना सिंग यांच्यासह सशस्त्र दलातील कर्मचारी तसेच दिग्गज यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

***

S.Thakur/P.Jambhekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1844417) Visitor Counter : 225