माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्रीय राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी राष्ट्रपती पदी निवड झालेल्या द्रौपदी मुर्मू यांची घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
22 JUL 2022 4:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जुलै 2022
भारताच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या द्रौपदी मुर्मू यांची केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी भेट घेतली. द्रौपदी मुर्मू या एक ऐतिहासिक नेत्या असून त्यांनी जीवनात अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात केली आहे आणि सामाजिक कार्यात भरीव योगदान दिले आहे, असे ट्विट डॉ एल मुरुगन यांनी केले आहे. निवडणुकीत मिळवलेल्या या यशाबद्दल डॉ मुरुगन यांनी द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन केले आहे.


S.Patil/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1843873)
आगंतुक पटल : 176