गृह मंत्रालय
निमलष्करी दलात अग्निवीरांसाठी आरक्षण
Posted On:
20 JUL 2022 7:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जुलै 2022
केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)/रायफलमन या पदावरील भरतीमध्ये 10% रिक्त पदे माजी अग्निवीरांसाठी आरक्षित ठेवण्यासाठी तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. कमाल वयोमर्यादेत सवलत आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणीतून सूट देखील दिली जाईल.
सरकारी सूचना/आदेशांनुसार, सीएपीएफ/एआर मधील विद्यमान आरक्षणांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:
Direct Recruitment
|
Scheduled Castes (SCs)
|
15%
|
Scheduled Tribes (STs)
|
7.5%
|
Other Backward Classes (OBCs)
|
27%
|
Economically Weaker Sections (EWSs)
|
10% reservation in direct recruitment in civil posts and services in Government of India to the persons belonging to EWSs who are not covered under the scheme of reservation for SCs, STs & OBCs as per DoP&T’s OM dated 31.01.2019.
|
Ex-servicemen
|
10% of the vacancies in the posts upto of the level of the Assistant Commandant in all para-military forces as per DoP&T notification dated 04.10.2012.
|
संरक्षण दलात चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर माजी अग्निवीरांची पहिली तुकडी भरतीसाठी उपलब्ध असेल तेव्हा कॉन्स्टेबल (जीडी)/रायफलमन या पदासाठी माजी अग्निवीरांना 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
N.Chitale/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1843232)
Visitor Counter : 187