आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसीच्या 200.33 कोटी पेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या


12 ते 14 वर्ष या वयोगटातील 3 कोटी 80 लाखांहून अधिक किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 1,43,654

गेल्या 24 तासात देशात 15,528 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.47%

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 4.57%आहे

Posted On: 19 JUL 2022 9:47AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 200.33 कोटींचा (2,00,33,55,257) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 2,64,01,846 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

16 मार्च 2022 रोजी देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 3 कोटी 80 लाखांहून अधिक (3,80,72,341) किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022 सुरु करण्यात आले आहे.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,10,439

2nd Dose

1,00,80,435

Precaution Dose

60,46,019

FLWs

1st Dose

1,84,27,814

2nd Dose

1,76,53,682

Precaution Dose

1,15,24,159

Age Group 12-14 years

1st Dose

3,80,72,341

2nd Dose

2,63,53,877

Age Group 15-18 years

1st Dose

6,08,73,139

2nd Dose

5,01,97,765

Age Group 18-44 years

1st Dose

55,89,43,347

2nd Dose

50,61,59,573

Precaution Dose

74,42,441

Age Group 45-59 years

1st Dose

20,35,77,575

2nd Dose

19,46,30,222

Precaution Dose

54,45,034

Over 60 years

1st Dose

12,73,67,539

2nd Dose

12,16,14,534

Precaution Dose

2,85,35,322

Precaution Dose

5,89,92,975

Total

2,00,33,55,257

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता 1,43,654 इतकी आहे,  देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही सख्या 0.33% आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.47% झाला आहे. गेल्या 24 तासात 16,113  रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,31,13,623 झाली आहे.

 

गेल्या 24 तासात, देशात नव्या 15,528 कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

 

गेल्या 24 तासात देशात एकूण 4,68,350 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 87 कोटी 01  लाखांहून अधिक (87,01,55,452) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 4.57% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 3.32% इतका नोंदला गेला आहे.

***

JPS/BhaktiS/Dy

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1842580)