PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 15 JUL 2022 7:22PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली/मुंबई 15 जुलै 2022

  • 199.47 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India's Active caseload currently stands at 1,39,073
  • Active cases stand at 0.32%
  • Recovery Rate currently at 98.48%
  • 16,994 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 4,30,45,350
  • 20,038 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (4.44%)
  • Weekly Positivity Rate (4.30%)
  • 86.86 cr Total Tests conducted so far; 4,50,820 tests conducted in the last 24 hours

 #Unite2FightCorona                                                                                 #IndiaFightsCorona

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 199.47(1,99,47,34,994) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,62,39,248 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटासाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.78 (3,78,17,085) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

भारतात उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,39,073 इतकी आहे, ही संख्या देशाच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 0.32% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.48% आहे. गेल्या 24 तासात 16,994 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे, आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) 4,30,45,350 झाली आहे.

गेल्या 24 तासात 20,038 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 4,50,820 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 86.86 (86,86,15,168) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.30% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 4.44% आहे.

इतर अपडेट्स :-

 

 

 R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1841880) Visitor Counter : 157