विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
कोव्हॅक्सिन ही लस SARS-CoV-2 विषाणू आणि त्याचे प्रकार, रोगाची तीव्रता कमी करून विषाणूचा भार नियंत्रित करण्यात मदत करू शकते : संशोधन
Posted On:
15 JUL 2022 7:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जुलै 2022
शास्त्रज्ञांना आपल्या संशोधनात आढळले आहे की कोवॅक्सिन लस, जी संपूर्ण निष्क्रिय विषाणूंचा वापरून करुन बनवलेली लस आहे, जी SARS-CoV-2 विषाणूला मज्जाव करणाऱ्या दिर्घकाळ टिकणारी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करते तसेच या विषाणूच्या विविध प्रकारांना लसीकरणानंतर कमीत कमी 6 महिने अटकाव करु शकतील अशा पेशींना प्रवृत्त करते सोबतच या विषाणूविरोधात लढा देण्याची प्रणाली लक्षात ठेवणाऱ्या टी प्रकारच्या पेशींची निर्मिती करते. यामुळे विषाणूचा भार नियंत्रित करण्यात मदत होऊ शकते आणि त्यामुळे रोगाची तीव्रता देखील कमी होऊ शकते.
BBV152/ कोव्हॅक्सीन लस कोविड विषाणूच्या Asp614Gly या प्रकारावर आधारित आहे आणि ती तुरटीमध्ये शोषलेल्या टोल-समान रिसेप्टर (TLR) च्या 7/8 एगोनिस्ट रेणू (imidazoquinolin) सह तयार करण्यात आली आहे. भारतात उत्पादित केलेली ही पहिली तुरटी (अलम) -इमिडाझोक्विनॉलिन या सहपदार्थांबरोबर बनवलेली लस होती आणि या लसीला मोठ्याप्रमाणावर तसेच आपत्कालीन वापरासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून अधिकृत मान्यता मिळाली होती. लसीच्या परिणामकारकतेसाठी क्लिनिकल चाचणी डेटा उपलब्ध असला तरी, विशेष पुराव्यावर आधारित धोरणनिर्मितीसाठी महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरीत राहिले होते. ही लस रोगप्रतिकारक स्मरणशक्ती प्रवृत्त करते की नाही, लस-प्रेरित स्मृती किती काळ टिकून राहते आणि SARS-CoV-2 विषाणूच्या प्रकारांविरूद्ध हे स्मृती प्रतिसाद टिकून राहण्यास सक्षम आहेत की नाही अशा प्रश्नांचा यामध्ये समावेश आहे.
योजना 1. निष्क्रिय SARS-CoV-2 लस Covaxin® ची रोगप्रतिकारक परिणामकारकता निर्धारित करण्यासाठी अभ्यास आराखड्याचे प्रतिनिधित्व करणारी योजना.
THSTI, फरिदाबाद, एम्स नवी दिल्ली, ESIC मेडिकल कॉलेज, फरिदाबाद, LNJP हॉस्पिटल नवी दिल्ली, LJI, LA जोला, डॉ. निमेश गुप्ता आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोलॉजी (NII), नवी दिल्ली यांच्या बहु-संस्थात्मक सहकार्याने SARS-CoV-2 विषाणूची लागण न झालेल्या 97 व्यक्तींची लसीचे 2-डोस दिल्यानंतर 6 महिन्यांपर्यंत तपासणी करण्यात आली. त्यानंतर लस-प्रेरित प्रतिसादांची तुलना सौम्य COVID-19 मधून बरे झालेल्या 99 व्यक्तींमधील रोगप्रतिकारक स्मरणशक्तीशी करण्यात आली.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाअंतर्गत कार्यरत संस्था, विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाद्वारे करण्यात आलेल्या आयआरएचपीए -कोविड -19 विशेष अभ्यासात असे आढळून आले की, ही लस विषाणूच्या संसर्गाप्रमाणेच विषाणूच्या स्पाइक, आरबीडी आणि न्यूक्लियोप्रोटीन विरुद्ध प्रतिपिंडे म्हणजे अॅंटी बॉडीज तयार करते. तसेच विषाणूपासून रक्षण करणाऱ्या आणि विषाणू निष्क्रिय करणाऱ्या अशा दोन्ही प्रतिपिंडांच्या विश्लेषणातून डेल्टा (भारत), बीटा (दक्षिण . आफ्रिका) आणि अल्फा (यूके) सारख्या विषाणूच्या चिंतेचे प्रकार आढळणे कमी झाल्याचे दिसून आले.
ही लस मेमरी (प्रतिक्षमता) बी पेशींना प्रेरित करण्यासाठी सक्षम आहे .प्रतिपिंड कालांतराने कमी होऊ शकतात, मात्र या मेमरी (प्रतिक्षमता) बी पेशी जेव्हा आवश्यक असेल तेव्हा विषाणू विरूद्धची प्रतिपिंड पुन्हा भरून काढू शकतात., हे समाधानकारक असल्याचे , या अभ्यासातून दिसून आले आहे.
या अभ्यासाने निष्क्रिय विषाणू लसीला प्रतिसाद देताना मानवामध्ये निर्माण झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीच्या तपशीलवार वैशिष्ट्यांचा पहिला पुरावा सादर केला आहे.
रचना 2 . ही रचना कोवॅक्सिनच्या (Covaxin® ) 2 मात्रा प्राप्त झालेल्या सहभागींच्या रक्त नमुन्यातील सार्स -सीओव्ही -2 विशिष्ट मेमरी बी पेशी मोजण्याचे तंत्र दाखवते.
या लसीने सार्स -सीओव्ही -2 विशिष्ट टी पेशी तयार करण्याची क्षमता दर्शविली आहे, असे या अभ्यासकांच्या चमूला आढळून आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, प्रतिपिंडांपेक्षा वेगळी ,टी पेशींची परिणामकारकता विषाणूच्या स्वरूपांविरोधात चांगल्या पद्धतीने संरक्षित केली गेली आहे. तसेच, या विषाणू-संबंधित टी पेशी, मध्यवर्ती मेमरी (प्रतिक्षमता) भागामध्ये उपस्थित होत्या आणि लसीकरणानंतर 6 महिन्यांपर्यंत टिकून राहिल्या, असेही या अभ्यासकांना आढळून आले आहे.
सार्स -सीओव्ही -2 विषाणूचे प्रकार लसीद्वारे निर्माण केलेल्या प्रतिपिंड प्रतिसादांवर परिणाम करू शकतात. मात्र ,टी पेशी या विषाणूच्या प्रकारांविरोधात जोरदार प्रतिसाद देण्यासाठी उपलब्ध असतील नेचर मायक्रोबायोलॉजी या नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेला हा अभ्यास कोवॅक्सीनच्या (Covaxin®) भविष्यातील वापराच्या अनुषंगाने पुराव्यावर आधारित धोरण तयार करण्यासाठी महत्त्वाची माहिती प्रदान करतो.
प्रकाशन दुवा:
https://doi.org/10.1038/s41564-022-01161-5
R.Aghor/S.Chavan/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1841859)
Visitor Counter : 192