ग्रामीण विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘राष्ट्रीय ग्रामीण विकास अभियाना’च्या नावाखाली सुरू असलेल्या फसव्या भर्ती प्रक्रियेपासून जनतेने सावधगिरी बाळगण्याचे केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाचे जनतेला आवाहन

Posted On: 15 JUL 2022 7:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जुलै 2022

 

केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने, मंत्रालयाच्या नावाचा हेतुपुरस्सर वापर करून भर्ती प्रक्रिया राबवीत  असलेल्या  एका बनावट संस्थेच्या दाव्यांकडे जनतेचे लक्ष वेधले आहे.

आपले कार्यालय राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (एनआरएलएम), एनडीसीसी-II,7 वा मजला, जयसिंग रोड, नवी दिल्ली येथे आहे आणि परिचालनाचा पर्यायी पत्ता 12, लोधी रोड, 110003 येथे असून संपर्क क्रमांक 8375999665 आहे असा दावा राष्ट्रीय ग्रामीण विकास अभियान-एनआरडीएम (nrdm.in)या संस्थेने केला आहे. भारत सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्यरत असल्याचा या संस्थेचा दावा चुकीचा असून या संस्थेचा मंत्रालयाशी काहीही संबंध नाही, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

राष्ट्रीय ग्रामीण विकास अभियान- एनआरडीएम (nrdm.in)या संस्थेने केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या आणि/किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांच्या नावाचा हेतुपुरस्सर वापर करून नेमणुकीसंदर्भात केलेले व्यवहार फसवणूक करणारे आहेत आणि सरकारने हे दावे फेटाळले आहेत . त्यामुळे अशा प्रकारच्या प्रक्रियेपासून सामान्य जनतेने सावध राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय भर्ती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदारांकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क अथवा इतर कोणतेही शुल्क आकारत नाही तसेच अर्जदारांकडून त्यांच्या बँक खात्याच्या माहिती मागवत नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.

 

 

 

 

R.Aghor/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1841856) Visitor Counter : 192