सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

खादी उत्कृष्टता केंद्राने खादीसाठी विकसित केलेल्या नॉलेज पोर्टलचे खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने उद्‌घाटन केले

Posted On: 15 JUL 2022 3:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जुलै 2022

खादी संस्थांना डिझाइन संबंधी मार्गदर्शन करण्यासाठी खादी उत्कृष्टता केंद्राने नॉलेज पोर्टल विकसित करून एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. 14 जुलै 2022 रोजी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रीता वर्मा यांच्या हस्ते या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. खादी संस्थांना मदत करण्यासाठी एमएसएमई मंत्रालयाच्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने एनआयएफटी येथे खादी उत्कृष्टता केंद्राची स्थापना केली आहे.

खादी नॉलेज पोर्टल खादी संस्थांच्या विविध विभागांपर्यंत डिझाइन संबंधी माहिती पोहचवण्याचा प्रयत्न करते. खादीसाठी उपयुक्त विशेष बदल करून डिझाइनमध्ये नावीन्य आणण्याचा पोर्टलचा उद्देश आहे. चार संकल्पना/डिझाइन संबंधी सूचना आखण्यात आल्या असून खंड I मध्ये सादर केल्या आहेत. प्रत्येक डिझाईनची एक मुख्य संकल्पना, रंग संगती असून डिझाइन्स, प्रिंट्स, पोत आणि दर्शनी भागांसाठी दिशानिर्देश आहेत. प्रत्येक डिझाईनची होम आणि तयार कपडे अशा दोन भागात विभागणी केली आहे. संकल्पना व्यतिरिक्त, पोर्टलवर होम  आणि तयार कपड्यांसाठी साईझ चार्ट, छायाकृती, बटणे आणि क्लोजर्स, जोड शिवण आणि फिनिशिंग देखील उपलब्ध आहे.

ऋतू आणि प्रचलित फॅशन नुसार सूचना देण्यासाठी वर्षातून दोनदा माहितीचे अद्यतन केले जाईल. केवळ खादी संस्थांसाठीच नाही तर खादीपासून कपडे, घरगुती उत्पादने आणि पॅकेजिंग विकसित करण्यासाठी सहाय्य करणाऱ्या संस्थांसाठी देखील ही माहिती उपयुक्त ठरेल अशी यामागची कल्पना आहे. पोर्टलमध्ये नमुना म्हणून दाखवलेले कापड खास खादीचे विविध जाडीचे धागे वापरून विणले गेले आहे जेणेकरुन घरासाठी आणि परिधान करायच्या कपड्यांसाठी पोत आणि डिझाईनची चाचपणी करता येईल.

हे पोर्टल सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर खादीच्या संकेतस्थळावर www.coek.in पाहता येईल.


S.Tupe/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1841741) Visitor Counter : 209