कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बागायती पिकांचे क्षेत्रफळ आणि उत्पादनाचा दुसरा आगाऊ अंदाज (2021-22) जारी


वर्ष 2021-22 मध्ये बागायती पिकांच्या उत्पादनात 7.03 दशलक्ष टन इतकी वाढ होऊन ते 341.63 दशलक्ष टन होण्याचा अंदाज

Posted On: 14 JUL 2022 6:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जुलै 2022

 

कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने राज्ये/ केंद्रशासित प्रदेश आणि सरकारी स्रोतांकडून उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारावर (2021-22) साठीचा बागायती पिकांचे क्षेत्र आणि उत्पादनाचा दुसरा आगाऊ अंदाज प्रसिद्ध केला आहे.

Total Horticulture

2020-21
(Final)

2021-22
(1st Adv. Est.)

2021-22
(2ndAdv. Est.)

Area(in Million Ha)

27.48

27.56

27.74

Production(in Million Tonne)

334.60

333.25

341.63

2021-22 दुसरा आगाऊ अंदाज

  • वर्ष 2021-22 मध्ये बागायती पिकांच्या उत्पादनात  7.03 दशलक्ष टन इतकी वाढ होऊन ते  341.63 दशलक्ष टन होण्याचा अंदाज 2021-22 (अंतिम) च्या तुलनेत (2.10% टक्क्यांची  वाढ)
  • फळे, भाज्या आणि मधाच्या उत्पादनात वाढ, तर मसाले, फुले, सुगंधी आणि औषधी वनस्पती तसेच लागवडीखालील पिकांच्या उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत घट अपेक्षित आहे.
  • फळांचे उत्पादन 2020-21च्या 102.48 दशलक्ष टन उत्पादनाच्या तुलनेत 107.10 दशलक्ष टन अपेक्षित आहे
  • भाज्यांचे उत्पादन 2020-21च्या 200.45 दशलक्ष टन उत्पादनाच्या तुलनेत 204.61 दशलक्ष टन अपेक्षित आहे
  • कांद्याचे उत्पादन 2020-21च्या 26.64 दशलक्ष टन उत्पादनाच्या तुलनेत 31.70 दशलक्ष टन अपेक्षित आहे
  • बटाट्याचे उत्पादन 2020-21च्या 56.17 दशलक्ष टन उत्पादनाच्या तुलनेत 53.58 दशलक्ष टन अपेक्षित आहे
  • टोमॅटोचे उत्पादन 2020-21च्या 21.18 दशलक्ष टन उत्पादनाच्या तुलनेत 20.34 दशलक्ष टन अपेक्षित आहे

 

 

 

 

S.Patil/B.Sontakke /P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1841531) Visitor Counter : 245


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil