आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशातील कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला एकूण 199.27 कोटी मात्रांचा टप्पा


12 ते 14 वयोगटातील 3.76 कोटींपेक्षा जास्त मुलांना लसीचा पहिली मात्रा देण्यात आली

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,36,076

गेल्या 24 तासात 20,139 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.49%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 4.37%

Posted On: 14 JUL 2022 9:16AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 199.27 (1,99,27,27,559)  कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,61,97,150  सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

 

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटासाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू  झाली. आतापर्यंत 3.76 (3,76,98,593)  कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून  18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,10,027

2nd Dose

1,00,77,006

Precaution Dose

59,51,763

FLWs

1st Dose

1,84,26,752

2nd Dose

1,76,46,995

Precaution Dose

1,12,38,648

Age Group 12-14 years

1st Dose

3,76,98,593

2nd Dose

2,56,32,231

Age Group 15-18 years

1st Dose

6,07,62,753

2nd Dose

4,98,22,795

Age Group 18-44 years

1st Dose

55,87,50,479

2nd Dose

50,50,43,015

Precaution Dose

42,37,755

Age Group 45-59 years

1st Dose

20,35,44,220

2nd Dose

19,43,63,195

Precaution Dose

31,51,234

Over 60 years

1st Dose

12,73,41,249

2nd Dose

12,14,46,533

Precaution Dose

2,71,82,316

Precaution Dose

5,17,61,716

Total

1,99,27,27,559

 

 

भारतात सक्रीय रुग्णभार सध्या 1,36,076 इतका आहे,तो देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.31%  इतका आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.49% आहे.गेल्या 24 तासांत 16,482  कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे, आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून)  4,30,28,356 झाली आहे.

गेल्या 24 तासात 20,139  नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 3,94,774  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 86.81  (86,81,64,348)   कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.37%  तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 5.10% आहे.

***

S.Thakur/B. Sontakke/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1841388) Visitor Counter : 170