संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण क्षेत्राच्या सार्वजनिक उपक्रमांच्या अशासकीय संचालकांना ‘आत्मनिर्भर भारत’ साध्य करण्यासाठी प्रयत्न करून राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्याचे केले आवाहन


विधायक सूचनांच्या माध्यमातून  संरक्षण क्षेत्राचे सार्वजनिक उपक्रम  जगात सर्वोत्कृष्ट ठरावेत यासाठी मार्गदर्शन करू शकतील असे ते दक्ष पहारेकरी आहेत -राजनाथ सिंह

Posted On: 13 JUL 2022 4:10PM by PIB Mumbai

 

संरक्षण  मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांच्या अशासकीय संचालकांना  'संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्णता' साध्य करण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे आवाहन केले.  13 जुलै 2022 रोजी नवी दिल्ली येथे संरक्षण उत्पादन विभागातर्फे आयोजित पहिल्या कार्यशाळेत ते संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि अशासकीय संचालकांना संबोधित करत होते. देश आत्मनिर्भर आणि सक्रिय होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'आत्मनिर्भर भारत'चे स्वप्न साकार करण्यासाठी सामूहिक प्रयत्न केंद्रस्थानी असल्याचे प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी  केले.

संरक्षण मंत्र्यांनी अशासकीय संचालकांचे वर्णन सार्वजनिक उपक्रम आणि संरक्षण मंत्रालय यांच्यातील दुवा असे  केले आहे, जे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील कॉर्पोरेट प्रशासन  मजबूत करण्यासोबतच  सरकारच्या धोरणांनुसार काम चालेल हे देखील सुनिश्चित करतात.  सूचना देण्यातील  स्वातंत्र्य हे त्यांचे सर्वात मोठे सामर्थ्य असल्याचे नमूद करताना  त्यांनी अशासकीय संचालकांना सरकारच्या उद्दिष्टांनुसार व्यवस्थापनाच्या कामगिरीची पडताळणी करण्याचे ; सकारात्मक सूचना  आणि विधायक  टीका करून निर्णय प्रक्रियेत  मूल्यवर्धन करणे आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमसरकार आणि त्याही पलिकडे जाऊन देशाच्या हिताचे रक्षण करण्याचे आवाहन केले.

राजनाथ सिंह यांनी अशासकीय संचालक  हे दक्ष पहारेकरी आहेत असे सांगितले.  जे धोरण,कामगिरी, जोखीम व्यवस्थापन, संसाधने, महत्त्वाच्या नियुक्त्या, सीएसआर, शाश्वत विकास आणि सार्वजनिक उपक्रमांच्या  परिचालन मानकांवर देखरेख ठेवतात.

सार्वजनिक उपक्रमांना  त्यांचे उद्दिष्ट गाठण्यात मदत करण्यात  अशासकीय संचालकांचे अमूल्य योगदान त्यांनी अधोरेखित केले आणि  त्यांना खाजगी क्षेत्रात प्रचलित  सर्वोत्तम पद्धती सादर करण्याचे आणि धोरण आखणीसाठी सूचना  आणि मार्गदर्शन सामायिक करण्याचे आवाहन केले. अशासकीय संचालकांनी सार्वजनिक उपक्रमांना मोठ्या प्रमाणावर संशोधन आणि विकास करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे  आणि त्यांना योग्य  जोखीम स्वीकारण्यासाठी प्रेरित केले पाहिजे असेही ते म्हणाले. अलिकडच्या काळात सार्वजनिक उपक्रमांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची प्रशंसा करून संरक्षणमंत्र्यांनी मुख्य व्यवस्थापकीय संचालकांना अशासकीय संचालकांनीच्या  सूचनांवर  योग्य कारवाई करण्याचे आवाहन केले.

***

S.Kakade/S.Kane//P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1841200) Visitor Counter : 171