आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 199 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वयोगटातील 3.75 कोटींपेक्षा जास्त किशोरवयीनांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,31,043

गेल्या 24 तासात 13,615 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.50%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 4.24%

Posted On: 12 JUL 2022 9:33AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 199 (1,99,00,59,536) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,61,19,579 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

 

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.75 (3,75,56,269) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,09,858

2nd Dose

1,00,74,593

Precaution Dose

59,06,373

FLWs

1st Dose

1,84,26,182

2nd Dose

1,76,42,924

Precaution Dose

1,10,24,679

Age Group 12-14 years

1st Dose

3,75,56,269

2nd Dose

2,53,00,394

Age Group 15-18 years

1st Dose

6,07,19,921

2nd Dose

4,96,64,469

Age Group 18-44 years

1st Dose

55,86,84,184

2nd Dose

50,45,22,788

Precaution Dose

40,88,565

Age Group 45-59 years

1st Dose

20,35,33,658

2nd Dose

19,42,34,210

Precaution Dose

30,87,878

Over 60 years

1st Dose

12,73,32,178

2nd Dose

12,13,59,355

Precaution Dose

2,64,91,058

Precaution Dose

5,05,98,553

Total

1,99,00,59,536

 

 

भारतातील रुग्णसंख्या सध्या 1,31,043 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.30% इतकी आहे.

 

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.50%. झाला आहे.

गेल्या 24 तासात 13,265 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,29,96,427 झाली आहे.

 

गेल्या 24 तासात 13,615 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 4,21,292 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 86.73 (86,73,10,272) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.24% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 3.23% आहे.

 

****

ST/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1840892) Visitor Counter : 159