निती आयोग
azadi ka amrit mahotsav

परमेश्वरन अय्यर यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निती आयोगाकडून स्वागत


परमेश्वरन अय्यर यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निती आयोगाकडून स्वागत करण्यात आले

Posted On: 11 JUL 2022 5:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जुलै 2022

 

पाणी आणि स्वच्छता क्षेत्रातील कार्याचा  25 वर्षांहून जास्त अनुभव असलेल्या अय्यर यांनी भारताच्या 20 अब्ज डॉलरच्या स्वच्छ भारत मोहिमेच्या अंमलबजावणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती, ज्या मोहिमेमुळे  55 कोटी  लोकांना सुरक्षित आणि स्वच्छ राहणीमान उपलब्ध झाले.

नीती आयोगाचा  मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुन्हा देशाची सेवा करण्याची अतुलनीय संधी मला  मिळाल्याबद्दल मी नतमस्तक आहे तसेच बदललेल्या भारतासाठी आपल्या  नेतृत्वाखाली काम करण्याची आणखी एक संधी दिल्याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही मनःपूर्वक आभारी आहे, असे यावेळी अय्यर यांनी आपलं मनोगत व्यक्त करतांना सांगितलं.

उत्तर प्रदेश केडरचे 1981-च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असलेल्या  अय्यर यांनी सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रांमध्ये काम केले आहे. 2016 ते 2020 दरम्यान ते नवी दिल्लीतील पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयात भारत सरकारचे सचिव होते.

 

 S.Patil /G.Deoda/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 


(Release ID: 1840779) Visitor Counter : 303