खाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

खाणींच्या यशस्वी लिलावासाठी राज्यांना प्रोत्साहनपर लाभ देणार - प्रल्हाद जोशी


खाण मंत्रालयाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आयकॉनिक सप्ताह समारंभास सुरुवात

प्रविष्टि तिथि: 11 JUL 2022 2:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जुलै 2022

 

राज्य सरकारांना खाणींचा यशस्वी लिलाव केल्याबद्दल  तसेच ज्यांनी संभाव्य खनिज ब्लॉक्स शोधले आहेत त्यांना प्रोत्साहनपर लाभ दिले जातील असे केंद्रीय संसदीय व्यवहार ,कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी आज म्हणाले. त्यामुळे इतर राज्यांना खाण क्षेत्रात चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळेल. उद्या नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय खाण आणि खनिजांच्या परिषदेत यशस्वी राज्यांना पुरस्कार दिले जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रल्हाद जोशी यांनी आज खाण मंत्रालयाच्या ‘आझादी का अमृत महोत्सव आयकॉनिक’ सप्ताह समारंभाचे उद्‌घाटन केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे प्रमुख पाहुणे असतील असेही ते म्हणाले.

खाण मंत्रालयाचे सचिव, आलोक टंडन  यावेळी म्हणाले की, मंत्रालयाच्या सार्वजनिक क्षेत्र उपक्रमाअंतर्गत असणाऱ्या देशभरातील कार्यालयांमध्ये 11 ते 17 जुलै दरम्यान हा आयकॉनिक सप्ताह साजरा होत आहे.

 

Jaydevi PS /G.Deoda/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1840723) आगंतुक पटल : 269
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Telugu