राष्ट्रपती कार्यालय
ईद-उझ-जुहाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
09 JUL 2022 5:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जुलै 2022
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी ईद-उझ-जुहाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
“ईद-उझ-जुहाच्या निमित्त मी सर्व देशवासीयांना, विशेषत: आपल्या मुस्लिम बांधवांना आणि भगिनींना शुभेच्छा देतो असे राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
ईद-उझ-जुहा हा सण त्याग आणि मानवतेच्या सेवेचे प्रतीक आहे. हा सण आपल्याला हजरत इब्राहिम यांनी दाखवलेल्या त्यागाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो.
या निमित्ताने मानवजातीच्या सेवेसाठी स्वतःला झोकून देऊन राष्ट्राच्या समृद्धीसाठी आणि विकासासाठी कार्य करण्याचा संकल्प करूया.
राष्ट्रपतींचा संदेश हिंदीत पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
* * *
N.Chitale/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1840381)
आगंतुक पटल : 277