खाण मंत्रालय

खाण मंत्रालयाद्वारे नवी दिल्लीत खाण आणि खनिजांवर आधारित सहाव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त साजऱ्या होणाऱ्या आयकॉनिक सप्ताहा अंतर्गत आयोजित या राष्ट्रीय परिषदेला केन्द्रीय गृहमंत्री अमित शहा प्रमुख पाहुणे म्हणून राहाणार उपस्थित

Posted On: 09 JUL 2022 10:41AM by PIB Mumbai

खाण मंत्रालयाने 12 जुलै 2022 रोजी नवी दिल्ली येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आयकॉनिक सप्ताहा अंतर्गत खाण आणि खनिजांवर आधारित 6 व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केन्द्र येथे आयोजित परिषदेचे प्रमुख पाहुणे केन्दीय गृहमंत्री अमित शहा असतील.  केंद्रीय खाण, कोळसा आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी या एक दिवसीय परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी खाण, कोळसा आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, खाण मंत्रालयाचे सचिव आलोक टंडन आणि मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहाणार आहेत.

 

 

खाण क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांना राष्ट्रीय स्तरावरील, राष्ट्रीय खनीज विकास पुरस्कार प्रदान करणे, खनिकर्म शोध प्रणालीच्या (मायनिंग टेनेमेंट सिस्टम, एमटीएस) तीन मॉड्यूल्सचा प्रारंभ, वर्ष 2020-21 साठी पंचतारांकीत खाणींकरीता पुरस्कार आणि राष्ट्रीय जैव विज्ञान पुरस्कार 2019 ही या परिषदेची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत.

 

उद्घाटन सत्रात, राष्ट्रीय खनिज अन्वेषण विश्वस्त मंडळाचे (एनएमईटी) तांत्रिक सत्र आणि खाणकामातील ऑटोमेशन या विषयावरील सत्र आयोजित केले जाईल. गोलमेज चर्चेदरम्यान विविध खाण कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी भारताच्या खाण क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचारमंथन करतील.

 

खाण मंत्रालयाने 2016 मध्ये राष्ट्रीय खाण परिषदेची संकल्पना मांडली.  धोरणकर्ते असलेले केंद्र सरकारचे अधिकारी, लिलाव प्रक्रियेत प्रत्यक्ष अमंलबजावणी करणारे राज्य सरकारी अधिकारी तसेच उद्योग आणि त्यांच्या संघटना यांच्यात संवाद साधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या परिषदेची सुरुवात झाली.

****

Jaydevi PS/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1840333) Visitor Counter : 136


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu