गृह मंत्रालय

जपानचे माजी पंतप्रधान शिन्झो आबे यांना आदरांजली वाहण्यासाठी उद्या भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा

Posted On: 08 JUL 2022 6:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 जुलै 2022

 

जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांचे 8 जुलै 2022 रोजी निधन झाले. दिवंगत आबे यांना आदरांजली म्हणून, उद्या देशभरात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

दुखवटा असताना, देशभरात ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जातो त्या सर्व इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल आणि त्या दिवशी कोणतेही औपचारिक मनोरंजनपर कार्यक्रम होणार नाहीत.


* * *

S.Patil/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1840159) Visitor Counter : 170