आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रोगवाहक कीटकांवर नियंत्रण आणि निर्मूलनासाठी जन अभियान सुरू करण्याच्या अनुषंगाने "लोक भागीदारी" महत्त्वपूर्ण: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डॉ मनसुख मांडविया यांच्या राज्यांना सूचना


कीटकजन्य रोगांचे उच्चाटन करण्यासाठी आंतर-क्षेत्रीय, बहु-भागीदार आणि बहु-स्तरीय सहकार्य बळकट करण्याचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

Posted On: 08 JUL 2022 4:01PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 जुलै 2022

 

घरे, परिसर आणि आसपासच्या जागा डासांपासून मुक्त असल्याचे सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने, नागरिक आणि समुदायांना यासाठी प्रोत्साहित आणि संलग्न करण्यासाठी लोकसहभागासह  जन अभियान सुरू करण्याचे आवाहन डॉ मनसुख मांडविया यांनी राज्यांना केले आहे. रोगवाहक कीटक नियंत्रण आणि निर्मूलनासाठी जन अभियान सुरू करण्यासाठी "लोक भागीदारी" महत्त्वपूर्ण आहे. आपल्या आजूबाजूच्या परिसरात कोणत्याही कीटकांची पैदास  होणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी आपण आपल्या स्वतःच्या घरापासून आणि समुदायापासून सुरुवात करूया.”, असे त्यांनी सांगितले.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय  आरोग्यमंत्र्यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून कीटकजन्य रोगांचे प्रमाण जास्त असलेल्या 13 राज्यांसह (उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, महाराष्ट्र, पंजाब राजस्थान त्रिपुरा, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, ओदीशा  आणि तमिळनाडू) कीटकजन्य  रोगांना प्रतिबंध आणि नियंत्रणाच्या तयारीचा आढावा घेतला.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003ZR5C.jpg

कीटकजन्य रोग नियंत्रण आणि निर्मूलनाचा मुद्दा विविध विभागांशी  निगडित असून यासाठी अन्य विभागांकडून सहकार्य आवश्यक आहे  हे अधोरेखित करत डॉ. मांडविया यांनी ,राज्यांना आंतर-क्षेत्रीय समन्वय सुनिश्चित करण्यासाठी   आणि आदिवासी कल्याण, शहरी विकास (नागरी कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी), ग्राम  विकास (पीएमएवाय जी  अंतर्गत पक्की घरे बांधण्यासाठी), पाणी आणि स्वच्छता, पशुसंवर्धन इत्यादी इतर संबंधित विभागांशी सहकार्याने काम करावे आग्रही सूचना राज्यांना केली. आईसी /सामाजिक  मोहिमेद्वारे कोरड्या दिवसाचे निरीक्षण करण्यासाठी, वैयक्तिक संरक्षणात्मक उपायांचा वापर, इ.च्या माध्यमातून रुग्णांसंदर्भात सूचना,रुग्ण व्यवस्थापन ,समुदाय प्रतिबद्धता सुनिश्चित करण्यासाठी आयुष्मान भारत- आरोग्य आणि निरामयता केंद्रांचा समावेश करण्याचा सल्ला यापूर्वीच राज्यांना देण्यात आला आहे. राज्यांना  कीटकनाशके, फॉगिंग मशीन इत्यादींसह औषध/निदान व्यवस्थेची वेळेवर उपलब्धता आणि प्रभावी वितरण सुनिश्चित करण्यास सांगितले होते. कोणत्याही उद्रेकाला प्रभावीपणे तोंड देण्यासाठी राज्यांनी जलद प्रतिसाद पथक (आरआरटी) तयार करण्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे, असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image00257SN.jpg

स्वयंसेवी  संस्था, नागरी समाज संस्था, सहाय्य संस्था यांच्याशी भागीदारी करून कालबद्ध परिणामांसह सूक्ष्म नियोजनाद्वारे काम करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिल्या. जागरुकता वाढवण्यासाठी, सामुदायिक एकत्रीकरण आणि किट, औषधे आणि इतर सेवांचे वितरण करण्यासाठी आपण घरोघरी मोहीम राबवण्याच्या दृष्टीने आशा आणि अंगणवाडी सेविकांना सहभागी करून   मोहीम राबवूया”, असे त्यांनी सांगितले.”  देशभरातील कीटकजन्य  आजारांचे प्रमाण  प्रभावीपणे कमी करण्यासाठी आणि निर्मूलन करण्यासाठी राज्ये आणि केंद्र सरकारचे  संयुक्त प्रयत्न ही गुरुकिल्ली आहे यावर त्यांनी भर दिला.

 

* * *

S.Patil/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1840101) Visitor Counter : 175