संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग 11 जुलै रोजी संरक्षणविषयक संसदीय सल्लागार समितीला अग्नीपथ योजनेची माहिती देणार
प्रविष्टि तिथि:
07 JUL 2022 8:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जुलै 2022
संरक्षणाविषयक संसदीय सल्लागार समितीची बैठक येत्या 11 जुलै 2022 रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. सैन्याच्या तिन्ही दलांमध्ये सैनिकांची भरती करण्याबाबत नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या अग्नीपथ योजनेच्या विविध पैलूंची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग या बैठकीत समितीला देणार आहेत.
संरक्षण सचिव, तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख आणि संरक्षण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
R.Aghor /U.Kulkarni/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1839952)
आगंतुक पटल : 195