संसदीय कामकाज मंत्रालय
संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, अर्जुन राम मेघवाल यांनी विविध मंत्रालयांच्या तयारीचा घेतला आढावा
Posted On:
06 JUL 2022 6:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जुलै 2022
संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनासाठी वैधानिक आणि सरकारी कामकाजाच्या इतर बाबींच्या तयारीचे मूल्यांकन करण्याच्या अनुषंगाने, संसदीय कामकाज आणि संस्कृती राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी विविध मंत्रालये/विभागांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पावसाळी अधिवेशन, 2022 हे 26 दिवस चालणार असून या कालावधीत सभागृहाच्या 18 बैठका होणार आहेत.
या बैठकीला विविध मंत्रालये/विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या मंत्रालयाच्या प्रशासकीय विभागाने प्रस्तावित केलेल्या कामकाजाची माहिती सादर केली.
या बैठकीची पूर्वतयारी म्हणून, संसदीय कार्य मंत्रालयाच्या अधिकार्यांनी 04.07.2022 रोजी विधी विभागाच्या अधिकार्यांसोबत विविध मंत्रालये/विभागांनी प्रस्तावित केलेल्या विधी आणि इतर बाबींचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.
S.Kulkarni /S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1839633)
Visitor Counter : 188