कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जून 2022 मध्ये कोळशाचे उत्पादन 32.57 टक्क्यांनी वाढून 67.59 दशलक्ष टन इतके झाले


75.46 दशलक्ष टन कोळसा पाठवण्यात आला

कोळसा आधारित वीज निर्मितीने जूनमध्ये 26.58% वाढ नोंदवली

Posted On: 06 JUL 2022 5:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जुलै 2022

 

देशातील कोळसा उत्पादन जून 2021 च्या 50.98 मेट्रिक टनच्या तुलनेत जून 2022 मध्ये 32.57 टक्क्यांनी वाढून 67.59 दशलक्ष टन वर पोहोचले. कोळसा मंत्रालयाच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, या वर्षी जूनमध्ये कोल इंडिया लिमिटेड, सिंगरेनी कोलीरीज कंपनी लिमिटेड आणि कॅप्टिव्ह माईन्स/इतरांनी अनुक्रमे 51.56 मेट्रिक टन, 5.56 मेट्रिक टन आणि 10.47 मेट्रिक टन उत्पादन करून 28.87%, 5.50% आणि 83.53% वाढ नोंदवली. अव्वल 37 कोळसा खाणींपैकी 22 खाणींनी 100% पेक्षा जास्त उत्पादन केले आणि इतर नऊ खाणींचे उत्पादन 80 ते 100% दरम्यान राहिले.

त्याच बरोबर कोळसा पाठवण्याचे प्रमाण जून 2021 च्या 62.53 मेट्रिक टन वरून 20.69% ने वाढून 75.46 मेट्रिक टन झाले. जून 22 दरम्यान, सीआयएल आणि कॅप्टिव्ह/इतर यांनी अनुक्रमे 58.98 मेट्रिक टन आणि 11.05 मेट्रिक टन कोळसा पाठवून अनुक्रमे 15.20% आणि 88.23% वाढ नोंदवली. एससीसीएलने या महिन्यात 0.46% ची नकारात्मक वाढ नोंदवली.

विजेच्या मागणीत वाढ झाल्यामुळे जून 21 मधील 49.62 मेट्रिक टनच्या तुलनेत वीज निर्मितीसाठी पाठवण्यात आलेल्या कोळशाचे प्रमाण 30.77% ने वाढून 64.89 मेट्रिक टन झाले आहे.

जून 2021 च्या तुलनेत जून 2022 मध्ये कोळसा आधारित वीज निर्मितीत 26.58% वाढ नोंदली गेली आहे. जून 2022 मध्ये एकूण वीज निर्मिती जून 2021 च्या तुलनेत 17.73% अधिक आहे. मात्र, जून 2022 मध्ये कोळसा आधारित वीजनिर्मिती मे 2022 मधील 98609 एमयूच्या तुलनेत 95880 एमयू झाली आणि 2.77% ची नकारात्मक वाढ नोंदली गेली. जून 2022 मध्ये एकूण वीज निर्मिती मे 2022 मधील 140059 एमयूवरून 138995 एमयू पर्यंत कमी झाली आहे आणि 0.76 % ची नकारात्मक वाढ नोंदली गेली.

 

 S.Tupe /S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1839614) Visitor Counter : 162


Read this release in: English , Urdu , Hindi , Odia , Tamil