भारतीय निवडणूक आयोग

भारताचे उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसंबंधी जाहीर सूचना

Posted On: 05 JUL 2022 3:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 जुलै 2022

 

भारताच्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आयोजित करण्यासाठी, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक कायदा, 1952 च्या कलम 4 च्या पोटकलमाअंतर्गत  (1) उत्पल कुमार सिंग, निवडणुक रिटर्निंग ऑफिसर, याद्वारे अशी जाहीर सूचना देत आहे की-

  1. या निवडणूकीसाठी उमेदवार किंवा त्याच्या प्रस्तावक किंवा समर्थकांपैकी कोणीही,आपले नामनिर्देशनपत्र कक्ष क्रमांक 18, तळमजला, संसद भवन, नवी दिल्ली येथील कार्यालयात,खाली स्वाक्षरी केलेल्या व्यक्तीला किंवा तो अपरिहार्यपणे अनुपस्थित असल्यास,  रिटर्निंग ऑफिसर, पी. सी. त्रिपाठी, संयुक्त सचिव, लोकसभा सचिवालय किंवा राजू श्रीवास्तव, संचालक, लोकसभा सचिवालय यांच्या कार्यालयात सकाळी 11 वा. आणि दुपारी 3 वाजेपर्यंत दिनांक 19 जुलै 2022 या कालावधीत कोणत्याही दिवशी (सार्वजनिक सुट्टी वगळता) पाठवू शकतो. 
  2. प्रत्येक नामनिर्देशन पत्रासोबत उमेदवाराची मतदार म्हणून नोंदणी असलेल्या संसदीय मतदारसंघाच्या मतदार यादीतील उमेदवाराच्या स्वतः च्या संबंधित नोंदीची प्रमाणित प्रत जोडलेली असावी;
  3. प्रत्येक उमेदवाराने पंधरा हजार रुपये रोख इतकी रक्कम जमा करणे अगत्याचे (जरुरीचे) आहे. ही रक्कम रिटर्निंग ऑफिसरकडे नामनिर्देशनपत्र सादर करताना रोख स्वरूपात जमा केली जाऊ शकते किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेत किंवा सरकारी तिजोरीत जमा करून ही रक्कम जमा झाल्याचे दर्शवणारी पावती नामनिर्देशनपत्रासोबत जोडणे आवश्यक आहे;
  4. नामनिर्देशन पत्रांचे अर्ज वर निर्देशित केलेल्या कार्यालयातून उपरोक्त वेळी मिळू शकतात;
  5. कायद्याच्या कलम 5B च्या उप-कलम (4) अन्वये स्विकारण्यात आलेली नामनिर्देशनपत्रे, बुधवार, दिनांक 20 जुलै रोजी सकाळी 11 वाजता; खोली क्रमांक 62, पहिला मजला, संसद भवन, नवी दिल्ली येथे छाननीसाठी घेतली जातील.  
  6. 22 जुलै 2022 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना उमेदवार,त्यांचे प्रस्तावक, किंवा समर्थकांपैकी कोणीही, ज्यांना या कार्यासाठी उमेदवाराने लिखित स्वरूपात अधिकृत केले आहे, ते वरील परिच्छेद (i) मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी स्वाक्षरी करून दिनांक 22 जुलै 2022 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत;पाठवू शकतात.
  7. नियमानुसार निश्चित केलेल्या मतदानाच्या ठिकाणी,या निवडणूकीसाठी होणारे मतदान शनिवार, दिनांक 6 ऑगस्ट, 2022 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 दरम्यान करता येईल.

 


* * *

S.Thakur/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1839337) Visitor Counter : 313