शिक्षण मंत्रालय
राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 च्या अंमलबजावणीचा भाग म्हणून राष्ट्रीय अभ्यासक्रम चौकटीच्या निर्मितीसाठी नागरिक केंद्रित सर्वेक्षणाच्या माध्यमातून सार्वजनिक सल्लामसलत
Posted On:
03 JUL 2022 6:10PM by PIB Mumbai
भारत सरकारने 29 जुलै 2020 रोजी राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 ची घोषणा केली, ज्यामध्ये राष्ट्रीय अभ्यासक्रम चौकटीच्या विकासाच्या माध्यमातून शिक्षण प्रणालीच्या दर्जात सुधारणा करण्याची शिफारस करण्यात आली आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम चौकटीची प्रक्रिया जिल्हा सल्लागार समित्या, जिल्हा केंद्रित गट आणि राज्य सुकाणू समिती, राष्ट्रीय केंद्रित गट आणि राष्ट्रीय सुकाणू समिती यांच्या स्थापनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. हे काम मोठ्या प्रमाणावर आणि कागदरहित पद्धतीने करण्यासाठी एक तंत्रज्ञान मंच- वेबसाईट आणि मोबाईल ऍप विकसित करण्यात आले आहे. खालपासून वरपर्यंत पाहणी करण्याच्या दृष्टीकोनाचा वापर करत जिल्हा स्तरीय सल्लामसलत, मोबाईल ऍप आधारित सर्वेक्षण, राज्य केंद्रित गट आणि राज्य सुकाणू समित्यांच्या माध्यमातून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून तळागाळाच्या पातळीवर पालक, अंगणवाडी कार्यकर्ते, शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक, विद्यार्थी इ. हितधारकांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य स्तरीय सल्लामसलत करण्यात येत आहे आणि शालेय शिक्षणाचे भवितव्य, लहान वयात बालकांची काळजी आणि शिक्षण, शिक्षकांचे शिक्षण आणि प्रौढ शिक्षण याविषयी त्यांचा दृष्टीकोन आणि मते जाणून घेतली जात आहेत.
राष्ट्रीय पातळीवर देखील राष्ट्रीय केंद्रित गट आणि राष्ट्रीय सुकाणू समित्या विविध मंत्रालये, स्वायत्त संस्था, स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट्स, समाजसेवी संस्था इ. सोबत संवाद साधून राष्ट्रीय अभ्यासक्रम चौकट तयार करण्यासाठी उपयुक्त असलेली माहिती आणि सूचना गोळा करण्याचे, ती संकलित करण्याचे काम करण्यामध्ये व्यग्र आहेत. एनसीएफ तयार करण्यासाठी संबंधित हितधारकांना मार्गदर्शन करण्यासाठी एक मार्गदर्शक दस्तावेज तयार करण्यात आला आहे.
देशातील विविधता पाहता, प्रत्येक हितधारकाला, जो एखादा पालक किंवा एखादा शिक्षक किंवा एखादा विद्यार्थी असू शकेल किंवा नसू शकेल आणि ज्याची भारतातील शिक्षण प्रणालीच्या परिवर्तनामध्ये शिक्षणासंदर्भातील सामायिक चिंताबाबत आपला दृष्टीकोन मांडून सहभागी होण्याची इच्छा असेल, त्यांना एक संधी देणे ही काळाची गरज आहे. असे अनेक आणि विविध प्रकारचे दृष्टीकोन एनईपी 2020 च्या दृष्टीकोनाची सहजतेने अंमलबजावणी करण्यासाठी एक वास्तविक आराखडा उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे.
याच संदर्भात भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने ऑनलाईन सार्वजनिक सल्लामसलतीद्वारे विविध हितधारकांचे दृष्टीकोन जाणून घेण्याचे नियोजन केले आहे. एनसीएफ तयार करण्यासाठी आणि त्याचबरोबर सिलॅबस, पुस्तके आणि इतर मार्गदर्शक सामग्री तयार करण्यासाठी ते अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
शिक्षक, मुख्याध्यापक, शालेय नेते, शिक्षणतज्ञ, पालक, विद्यार्थी, समुदाय सदस्य, स्वयंसेवी संस्था, तज्ञ, सार्वजनिक प्रतिनिधी, कलाकार, कारागीर, शेतकरी आणि ज्यांना शालेय शिक्षण आणि शिक्षकांचे शिक्षण यात रुची आहे असे कोणीही यांना आपल्या राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात समाविष्ट भाषांसह 23 भाषांमध्ये होत असलेल्या या ऑनलाईन सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे.
आमच्यासोबत यामध्ये सहभागी व्हा आणि भारतातील शिक्षणाच्या एका भक्कम, चिवट आणि सुसंगत परिसंस्थेच्या निर्मितीमध्ये योगदान देण्यासाठी ऑनलाईन सर्वेक्षणाचा वापर करा. या ऑनलाईन सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा : http://vsms.sms.gov.in/OMZhm8YvAQE
***
S.Tupe/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1838974)
Visitor Counter : 324