आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 197 कोटी 84 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या


12 ते 14 वर्ष या वयोगटातील मुलामुलींना कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 3 कोटी 68 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

देशातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 1,09,568

गेल्या 24 तासांत देशात 17,092 नव्या कोरोना बाधितांची नोंद

देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.54%

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 3.56% आहे

Posted On: 02 JUL 2022 11:49AM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 जुलै 2022

 

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 197 कोटी 84 लाखांचा (1,97,84,80,015) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 2,57,98,020 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

16 मार्च 2022 रोजी देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 3 कोटी 68 लाखांहून अधिक (3,68,29,621)किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022 पासून सुरु करण्यात आले आहे.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय विगतवारी खालीलप्रमाणे आहे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,09,062

2nd Dose

1,00,66,992

Precaution Dose

57,27,435

FLWs

1st Dose

1,84,24,280

2nd Dose

1,76,28,543

Precaution Dose

1,03,73,513

Age Group 12-14 years

1st Dose

3,68,29,621

2nd Dose

2,37,81,477

Age Group 15-18 years

1st Dose

6,04,90,350

2nd Dose

4,89,46,846

Age Group 18-44 years

1st Dose

55,83,21,812

2nd Dose

50,19,67,230

Precaution Dose

30,75,791

Age Group 45-59 years

1st Dose

20,34,58,642

2nd Dose

19,35,90,935

Precaution Dose

26,29,017

Over 60 years

1st Dose

12,72,72,456

2nd Dose

12,09,26,388

Precaution Dose

2,45,59,625

Precaution Dose

4,63,65,381

Total

1,97,84,80,015

 

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता 1,09,568 इतकी झाली आहेदेशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही संख्या सध्या 0.25% आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.54% झाला आहे. गेल्या 24 तासांत 14,684 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,28,51,590 झाली आहे.

गेल्या 24 तासांत, देशात नव्या 17,092 कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासांत देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 4,12,570 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 86 कोटी 32 लाखांहून अधिक (86,32,90,209) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 3.56% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर देखील  4.14%.इतका नोंदला गेला आहे.

***

S.Thakur/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1838793) Visitor Counter : 153