आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

डॉक्टर्स दिनानिमित्त लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालयामध्ये डॉ मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न

Posted On: 01 JUL 2022 6:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जुलै 2022

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली तसेच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री  डॉ भारती प्रवीण पवार आणि केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या उपस्थितीत आज लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालय  (एलएचएमसी ) येथे डॉक्टर्स दिन  साजरा करण्यात आला.

निःस्वार्थ सेवेसाठी वैद्यकीय जगताला  सलाम करत ,डॉ. मनसुख मांडविया म्हणाले की, “आपल्या  जीवनात आपले  डॉक्टर आणि वैद्यकीय व्यावसायिकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. दरवर्षी 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर्स दिन साजरा करणे हा त्यांच्या अफाट योगदानाचे  मोल जाणून घेण्याचा  असाच एक प्रयत्न आहे.”

 

“हे वर्ष आपल्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष आहे आणि स्वातंत्र्याचा अमृत  महोत्सव सुरु  आहे. समाज, मानवता आणि देशासाठी  डॉक्टर म्हणून दिलेले उत्कृष्ट समर्पण आणि अमूल्य योगदानाबद्दल, आम्ही 75  वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गजांचा सन्मान करून राष्ट्रीय डॉक्टर्स दिन  साजरा करत आहोत.'' असे ते म्हणाले.

आपले प्रयत्न देशाच्या  प्रगतीच्या दिशेने असले पाहिजेत; देश नेहमी प्रथम असला  पाहिजे.आपण आपला सेवाभाव सुरूच ठेवावा तरच आपण एक सुदृढ  भारत घडवू शकू, ज्यामुळे समृद्ध राष्ट्र  निर्माण होईल, यावर त्यांनी भर दिला.

अथक प्रयत्नांबद्दल आणि कोविड व्यवस्थापनात भारताला  जागतिक यशोगाथा बनवल्याबद्दल वैद्यकीय व्यावसायिकांचे,केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री  डॉ. भारती प्रवीण पवार यांनी  आभार मानले.“सर्व रुग्णांच्या सेवेबरोबरच आपण सर्वजण निरोगी भारत आणि सुदृढ  भारतासाठी काम करत आहोत, असे त्या म्हणाल्या. सरकार आरोग्य क्षेत्रात नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करत आहे,  टेलीमेडिसिन सेवांसारखे विविध उपक्रम देशाच्या अगदी दुर्गम भागातही मिशन मोडमध्ये राबवले जात आहेत.” अशी माहिती त्यांनी दिली.


* * *

S.Kane/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1838649) Visitor Counter : 209