अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या ‘प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग औपचारीकरण योजनेला' दोन वर्षे पूर्ण
महाराष्ट्रातील “भीमथडी” सह दोन राज्यस्तरीय ब्रँडचा यशस्वी प्रारंभ
Posted On:
01 JUL 2022 4:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जुलै 2022
केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाने 29 जून 2020 रोजी आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचे औपचारीकरण(पीएमएफएमई) ही योजना सुरू केली होती. या योजनेला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत आणि असंघटित सूक्ष्म उद्योगांना सक्षम करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही योजना अन्न प्रक्रिया क्षेत्राला औपचारिक करण्याचे लक्ष्य साध्य करत आहे आणि अर्थव्यवस्थेला अतिशय मोठ्या प्रमाणावर पाठबळ देत आहे आणि या योजनेची चांगली फळे मिळू लागली आहेत. सध्या 35 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत पत संलग्न अनुदानासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांचे अर्ज (www.pmfme.mofpi.gov.in) या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून भरले जातात.
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील एक जिल्हा एक उत्पादनचे तपशील उपलब्ध करण्यासाठी भारताची डिजिटल जीआयएस एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) नकाशा तयार करण्यात आला आहे.
या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना संपूर्ण मूल्य साखळीत पूर्ण मदत करण्यासाठी आणि पाठबळ पुरवण्यासाठी त्यांच्या उत्पादनांचे विपणन आणि ब्रँडिंग करण्यासाठी नाफेड आणि ट्रायफेडसोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्यानुसार नाफेडच्या सहकार्याने 10 ओडीओपी ब्रँड्स सुरू करण्यात आले आहेत. या योजनेमुळे राज्यस्तरीय ब्रँडना देखील पाठबळ मिळत आहे. आतापर्यंत दोन राज्य स्तरीय ब्रँडचा यशस्वी प्रारंभ करण्यात आला आहे. त्यामध्ये पंजाबच्या “आसना” आणि महाराष्ट्राच्या “भीमथडी” या ब्रँडचा समावेश आहे तर इतर अनेक येऊ घातले आहेत.
* * *
S.Kane/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1838574)
Visitor Counter : 416