उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

रथयात्रेच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींनी देशातल्या जनतेला दिल्या शुभेच्छा

Posted On: 30 JUN 2022 6:19PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती, एम. वेंकय्या नायडू यांनी रथयात्रेच्या पूर्वसंध्येला जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

त्यांनी संदेशात म्हटले आहे  -

रथयात्रेच्या पावन मुहूर्ताच्या निमित्ताने आपल्या देशातील जनतेचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो.

भगवान विष्णूंचा अवतार मानल्या जाणार्‍या भगवान जगन्नाथांची वार्षिक यात्रा  दर्शवणारी  ओडिशाची रथयात्रा,ही  भगवंताच्या  सर्वव्यापी आणि दिव्य स्वरूपाचा उत्सव साजरा करण्यासाठी  संपूर्ण समुदायाने एकत्र येण्याची सुसंधी आहे.  रथयात्रेत सहभागी होणारे  भाविक भगवान जगन्नाथाचा रथ ओढणे, याला भगवंताचा आशीर्वाद मिळणे,असे मानतात. रथयात्रेचा महिमा आणि वैभव खरोखरच अतुलनीय आहे.

रथयात्रेशी निगडित पवित्र आणि उदात्त आदर्श, आपले जीवन, शांती आणि सौहार्दाने समृद्ध करो!

 

संदेशाची हिंदी आवृत्ती खालीलप्रमाणे आहे:

मैं रथ यात्रा के पावन अवसर पर अपने देशवासियों को हार्दिक बधाई और शुभकामनाएँ देता हूं।

भगवान विष्णु के अवतार माने जाने वाले, भगवान जगन्नाथ की वार्षिक यात्रा को दर्शाती ओडिशा की रथ यात्रा, भगवान की दिव्यता और भव्यता का उत्सव मनाने के लिए सभी समुदायों के एक साथ आने का सुअवसर है। रथ यात्रा में भाग लेने वाले भक्तगण, भगवान जगन्नाथ के रथ को खींचना उनका आशीर्वाद मानते हैं। रथ यात्रा की महिमा और भव्यता वास्तव में अनुपम है।

मेरी शुभकामना है कि रथ यात्रा से जुड़े पवित्र और उच्च आदर्श हमारे जीवन को शांति और सौहार्द से ओतप्रोत कर दें।"

***

N.Chitale/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1838278) Visitor Counter : 77