कोळसा मंत्रालय
कोळसा मंत्रालयाने कोळसा खाण खड्ड्यांमुळे तयार झालेल्या पाच तलावांचा रामसर यादीत समावेश करण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाशी साधला संपर्क
प्रविष्टि तिथि:
29 JUN 2022 7:53PM by PIB Mumbai
भारताचे कोळसा क्षेत्र, वेगाने वाढणाऱ्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने कोळसा उत्पादनात आणखी वाढ करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. त्याच वेळी, पर्यावरणाची काळजी, जंगले आणि जैवविविधतेचे संरक्षण यासाठीच्या विविध उपायांवर भर देऊन शाश्वत विकासाचा मार्ग स्वीकारण्यात देखील कोळसा क्षेत्र पुढाकार घेत आहे. विविध शाश्वत उपक्रमांचा एक भाग म्हणून, कोल इंडिया लिमिटेड (CIL) ने कोळशाच्या खाणीतील खड्ड्यांमुळे तयार झालेल्या तलावांचे संवर्धन, पाणथळ जमिनीच्या पर्यावरणीय स्वरूपाची देखभाल करणे हे उपक्रम हाती घेतले आहेत. यासोबतच, संबंधित राज्य सरकारे आणि पर्यावरण, वन तसेच हवामान बदल मंत्रालय (MoEFCC) यांच्या सहाय्याने अशा संवर्धीत तलावांचा प्रतिष्ठित रामसर यादीमध्ये समावेश करणे यासाठी देखील कोल इंडिया लिमिटेड प्रयत्नशील आहे.
पर्यावरण, वन तसेच हवामान बदल मंत्रालयाच्या (MoEFCC) मार्गदर्शनानुसार, कोल इंडिया लिमिटेडने (CIL) पश्चिम बंगाल, ओदिशा, झारखंड आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये रामसर यादीमध्ये समावेश करण्याजोग्या पाच खड्डे तलावांची यादी तयार केली आहे.
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1838067)
आगंतुक पटल : 270