रसायन आणि खते मंत्रालय

केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आगामी इंडिया-केम 2022 संदर्भात आढावा बैठक घेतली


हा कार्यक्रम पंतप्रधानांच्या ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ अभियानाला आणखी बळकट करेल: डॉ. मांडवीय

Posted On: 28 JUN 2022 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 जून 2022

 

केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली आगामी 12 व्या इंडिया केम-2022 च्या नियोजनासाठीची बैठक झाली. यंदाच्या आवृत्तीची संकल्पना आहे, “व्हिजन 2030-केम अॅण्ड पेट्रोकेमिकल्स बिल्ड इंडिया.” यावेळी बोलताना  केंद्रीय मंत्री म्हणाले, ”हा कार्यक्रम अफाट क्षमता आणि या क्षेत्राच्या शाश्वत वृद्धीला सहाय्य देणारे सरकारी धोरण प्रदर्शित करेल. हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया,मेक फॉर द वर्ल्ड’ अभियानाला आणखी बळकट करण्यासाठी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना संवाद साधण्यासाठी आणि एकत्र येण्यासाठी व्यासपीठ देखील उपलब्ध करेल.” डॉ. मांडवीय यांनी 12 व्या इंडिया केम-2022 ची   ‘व्हिजन 2030-केमिकल्स अॅण्ड पेट्रोकेमिकल्स बिल्ड इंडिया’ ही संकल्पना असलेले माहिती पत्रक देखील प्रकाशित केले.

हा कार्यक्रम गुंतवणूकदार आणि संधी ओळखण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. भारत सरकार आपले “व्यवसाय सुलभता” धोरण आणि प्रोत्साहानाद्वारे  जागतिक गुंतवणूकदारांसाठी अनुकूल परिसंस्था उपलब्ध करत असताना आगामी जागतिक कार्यक्रम, भारत हा  रसायने क्षेत्रातील  गुंतवणूकदार आणि भागधारकांसाठी पसंतीचे ठिकाण म्हणून आपले दर्शन घडवेल.

आशियाई-पॅसिफिक क्षेत्रामधील रसायने आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्राच्या सर्वात मोठ्या कार्यक्रमांपैकी एक असलेल्या 12 वे इंडिया केम-2022, ऑक्टोबर 6-8, 2022 या काळात रसायने आणि पेट्रोकेमिकल्स विभाग, फिक्कीच्या सहयोगाने आयोजित करणार आहे.  

भारतीय रसायन उद्योग आणि विविध औद्योगिक विभाग (उदाहरणार्थ, रसायने, पेट्रोकेमिकल्स, अॅग्रोकेमिकल उद्योग, प्रक्रिया आणि यंत्रसामग्री) यांची अफाट क्षमता प्रदर्शित करणे हे इंडिया केम प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे, जी सहाय्यकारी सरकारी धोरणे आणि गुंतवणूकदारांसाठी मोठ्या गुंतवणुकीच्या संधींद्वारे प्रदान करण्यात आली आहे.   

Click here to see the brochure for details.

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1837665) Visitor Counter : 139