पंतप्रधान कार्यालय
जी-7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांनी घेतली कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट
प्रविष्टि तिथि:
28 JUN 2022 7:59AM by PIB Mumbai
जी-7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जून 2022 रोजी जर्मनीतील श्लॉस एल्मौ येथे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली.
सामायिक मूल्ये असलेल्या मजबूत लोकशाहीचे नेते म्हणून त्यांची बैठक फलदायी होती, ज्यामध्ये त्यांनी भारत-कॅनडा द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली आणि व्यापार आणि आर्थिक संबंध, सुरक्षा आणि दहशतवादा विरोधातील सहकार्य, तसेच परस्परसंबंध आणखी दृढ करण्यावर त्यांची सहमती झाली.
परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर देखील त्यांनी विचारांचे आदान प्रदान केले.
***
S.Thakur/R.Agashe/Cyadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1837497)
आगंतुक पटल : 296
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Gujarati
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam