पोलाद मंत्रालय
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी नागपूरच्या मॉयल भवनात कामगार ‘स्नेह मिलन’ मध्ये झाले सहभागी
Posted On:
26 JUN 2022 9:29PM by PIB Mumbai
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरच्या मॉयल (MOIL) भवनाला भेट देऊन कामगार स्नेह मिलन कार्यक्रमात ते सहभागी झाले. मॉयल या सरकारी मँगनिज खाण कंपनीच्या कामगिरीचे गडकरी यांनी यावेळी कौतुक केले. देशातील मॅंगनीज आयात कमी करण्यासाठी कंपनीने उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत असेही त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने 1 नोव्हेंबर 2021 रोजी मॉयलच्या कर्मचाऱ्यांसाठी सुधारित वेतनाला मंजुरी दिली. याचा फायदा 5000 हून अधिक कामगारांना झाला. वेतन सुधारणांबद्दल गडकरी यांचे आभार मानण्यासाठी सर्व कामगार संघटनांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमाला कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आणि कार्यात्मक संचालक उपस्थित होते. नेहमी कंपनीसोबत असल्याबद्दल त्यांनी गडकरी यांचे आभार मानले.
कंपनीच्या मनुष्यबळ विकास संचालक उषा सिंग यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कंपनीने काही दिवसांपूर्वी म्हणजे 22 जून 2022 रोजी स्थापनेचे हीरक महोत्सवी वर्ष साजरे केल्याने हा कार्यक्रम आणखी खास आहे, असे उषा सिंग यावेळी म्हणाल्या.
***
N.Chitale/P.Jambhekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1837178)
Visitor Counter : 151