आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
देशातील एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 196.94 कोटी मात्रांचा टप्पा केला पार
12-14 वर्षे वयोगटातील किशोरांना 3.62 कोटींहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या
देशातील उपचाराधीन रुग्ण संख्या सध्या 91,779
गेल्या 24 तासात 15,940 नव्या रुग्णांची नोंद
कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.58%
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 3.30%
Posted On:
25 JUN 2022 9:32AM by PIB Mumbai
आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार, भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 196.94 कोटींहून अधिक (1,96,94,40,932) मात्रांचा टप्पा पार केला. 2,55,36,802 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून हे शक्य झाले आहे.
16 मार्च 2022 पासून 12-14 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 3.62 कोटींहून अधिक(3,62,20,781) किशोरवयीन मुलांना कोविड -19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, 18-59 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक प्रिकॉशन मात्रेचे लसीकरण देखील 10 एप्रिल 2022 पासून सुरू झाले.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:
Cumulative Vaccine Dose Coverage
|
HCWs
|
1st Dose
|
1,04,08,628
|
2nd Dose
|
1,00,60,891
|
Precaution Dose
|
56,11,589
|
FLWs
|
1st Dose
|
1,84,22,906
|
2nd Dose
|
1,76,19,383
|
Precaution Dose
|
99,40,140
|
Age Group 12-14 years
|
1st Dose
|
3,62,20,781
|
2nd Dose
|
2,23,36,175
|
Age Group 15-18 years
|
1st Dose
|
6,02,72,529
|
2nd Dose
|
4,82,78,560
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
55,80,69,125
|
2nd Dose
|
49,98,02,380
|
Precaution Dose
|
24,07,273
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
20,34,14,801
|
2nd Dose
|
19,30,99,268
|
Precaution Dose
|
22,93,280
|
Over 60 years
|
1st Dose
|
12,72,28,781
|
2nd Dose
|
12,05,89,141
|
Precaution Dose
|
2,33,65,301
|
Precaution Dose
|
4,36,17,583
|
Total
|
1,96,94,40,932
|
भारतात उपचाराधीन रुग्णांची संख्या 91,779 इतकी आहे. हे प्रमाण देशात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 0.21% आहे.
परिणामी, भारतात कोरोनामुक्तीचा दर 98.58%. इतका आहे. गेल्या 24 तासांत 12,425 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या (महामारीच्या आरंभापासून ) 4,27,61,481 इतकी झाली आहे.
गेल्या 24 तासात 15,940 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासात एकूण 3,63,103 कोविड-19 चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 86.02 कोटींहून अधिक (86,02,58,139) चाचण्या केल्या आहेत.
देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 3.30% आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 4.39% नोंदविण्यात आला आहे.
***
Jaydevi PS/BS/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1836926)
Visitor Counter : 173