रसायन आणि खते मंत्रालय
प्रक्रिया उद्योगात हरित हायड्रोजन आणि हरित अमोनियाचे उत्पादन आणि वापर' या विषयावरील चर्चासत्राच्या उद्घाटन सत्राचे केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी भूषवले अध्यक्षपद
भारतात हरित हायड्रोजन क्षेत्रात अपार संधी : डॉ. मनसुख मांडविया
Posted On:
24 JUN 2022 5:32PM by PIB Mumbai
केंद्रीय रसायने आणि खते आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी नवी दिल्लीत '‘प्रक्रिया उद्योगात हरित हायड्रोजन आणि हरित अमोनियाचे उत्पादन आणि वापर’ या विषयावरील दोन दिवसीय चर्चासत्राला संबोधित केले. हौज खास येथील आयआयटी दिल्लीच्या आवारात, रासायनिक अभियांत्रिकी विभाग, आयआयटी दिल्ली, भारतीय रासायनिक अभियंता संस्था (उत्तर क्षेत्रीय केंद्र) यांच्या वतीने आणि भारतीय खते संघटनेच्या (एफएआय ) सहकार्याने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी रसायन आणि खते राज्यमंत्री भगवंत खुबा उपस्थित होते.
"आपल्याला हरित हायड्रोजनच्या संशोधन आणि उत्पादन क्षेत्रात वाढ करण्याची तसेच विकासात आणि उत्पादनात नवोन्मेष आणण्याची गरज आहे.केवळ सरकार हरित ऊर्जेचे उद्दिष्ट साध्य करू शकत नाही तर राष्ट्रीय हायड्रोजन अभियानाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उद्योग-शिक्षण क्षेत्र -सरकारचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे.हरित ऊर्जा अभियान साकारण्यासाठी वैविध्यपूर्ण हवामान प्रणाली आणि भौगोलिक रचना यांसारखा मोठा भौगोलिक फायदा आपल्याला आहे'', असे या चर्चासत्राला संबोधित करताना केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.
राष्ट्र प्रथम या दृष्टीकोनासह हरित हायड्रोजनचे उत्पादन केवळ आपल्या देशासाठीच नव्हे तर जगासाठी परवडणारे आणि सुलभ बनवण्यासाठी काम करण्याचे आवाहन डॉ. मनसुख मांडवीया यांनी सगळ्यांना केले. "आपण सौर ऊर्जेची कार्यक्षमता वाढवण्याचे आणि या ऊर्जेची किंमत कमी करण्याचे लक्ष्य साध्य करू शकतो आणि विश्वगुरू बनू शकतो, असे ते म्हणाले.
***
N.Chitale/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1836782)
Visitor Counter : 178