प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालय, भारत सरकार
azadi ka amrit mahotsav

नॅशनल एअर क्वालिटी रिसोर्स फ्रेमवर्क ऑफ इंडिया (NARFI) वर विचारमंथन कार्यशाळा

Posted On: 24 JUN 2022 4:48PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय प्रगत अभ्यास संस्थेने प्रधान वैज्ञानिक सल्लागार (O/o PSA) कार्यालयाच्या मदतीने विकसित केलेल्या "नॅशनल एअर क्वालिटी रिसोर्स फ्रेमवर्क ऑफ इंडिया (NARFI)" या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय अभियानाचे  उदघाटन केंद्र  सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय कुमार सूद यांनी नवी दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटर  येथे  22 जूनला केले.  ही व्यवस्था हवेच्या गुणवत्तेचे डेटा संकलन, त्याच्या प्रभावाचा अभ्यास  आणि विज्ञान-आधारित तोडगा लागू करण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शन पुरवेल.

या कार्यक्रमात बोलताना प्रा. सूद यांनी सरकार, उद्योग आणि नागरिक या सर्व हितधारकांना एकत्र आणण्याच्या गरजेवर भर दिला. 'प्रदूषणाचा सामना ' ही एक जटिल आणि बहुआयामी समस्या आहेज्यासाठी संशोधक, सरकारी अधिकारी आणि नागरिकांनी एकत्र येणे आवश्यक आहे. समस्येचे निराकरण करण्यासाठी एकात्मिक, बहु-क्षेत्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान दृष्टीकोन आवश्यक आहे, तसेच समस्येचा  सामाजिक पैलू देखील समजून घेणे  आवश्यक आहे असे प्रा. सूद यांनी नमूद केले.

जलद उपाय शोधण्यासाठी संशोधक आणि उद्योग यांच्यात निकटचे  सहकार्य  आवश्यक आहे यावर भर देण्यात आला.

कार्यशाळेबाबत  प्रश्नांसाठी कृपया यांना  लिहा: gufranbeig[at]gmail[dot]com

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1836767) Visitor Counter : 232