भूविज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हवामानासंदर्भातील समस्या सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत संपूर्ण जगाचे नेतृत्व करत आहे


केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांची उत्तर प्रदेशातील नोएडास्थित मध्यम श्रेणीच्या हवामान अंदाजासंदर्भातील राष्ट्रीय केंद्राला (एनसीएमआरडब्ल्यूएफ) भेट

अत्यंत प्रचंड आणि विविधतेने भरलेल्या लोकसंख्येसाठी कार्य करताना, हवामान अंदाज व्यक्त करण्याच्या क्षेत्रात भारत आघाडीवर असून याबाबतीत तो जगात सर्वोत्तम ठरत आहे

Posted On: 23 JUN 2022 6:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 जून 2022

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); भूविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंग यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत हवामानविषयक समस्या सोडविण्यासाठी जगाचे नेतृत्व करत आहे. भारताच्या सर्वात प्रमुख आणि जगातील सर्वात अधिक अद्ययावत संस्थांपैकी एक असणाऱ्या नोएडास्थित मध्यम श्रेणीच्या हवामान अंदाजासंदर्भातील राष्ट्रीय केंद्राला (एनसीएमआरडब्ल्यूएफ) दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते.

हवामान बदलाच्या समस्येबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक जागतिक मंचावर वेळोवेळी भारताचा आवाज बुलंद केला आहे असे ते म्हणाले. भारताचे प्रचंड क्षेत्रफळ, विविधता, विविध घटकांची विषमता लक्षात घेऊन तसेच आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील भारताचे आघाडीचे स्थान बघता, हवामान बदलासारख्या जागतिक आव्हानांवर उपाययोजना करण्यासाठी संपूर्ण जग भारताकडे आशेने बघत आहे असे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी सांगितले.

 अत्यंत प्रचंड आणि विविधतेने भरलेल्या लोकसंख्येसाठी कार्य करताना, हवामान अंदाज व्यक्त करण्याच्या क्षेत्रात भारत आघाडीवर असून याबाबतीत तो जगात सर्वोत्तम ठरत आहे,असे सिंह यांनी सांगितले.  नरेंद्र मोदी यांच्यासारखे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाला उच्च पातळीवरील प्राधान्य देणारे आणि देशाच्या वैज्ञानिकांना उत्तम यश मिळविण्यासाठी सतत प्रोत्साहन देणारे पंतप्रधान आपल्या देशाला लाभले आहेत असे त्यांनी सांगितले. भारतीय युवकांकडे नैसर्गिकपणेच एक वैज्ञानिक दृष्टी आहे असे मत व्यक्त करून केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग म्हणाले की, भारत सरकारदेखील या युवकांना अधिक व्यापक अनुभव मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे.

 S.Kulkarni/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1836550) Visitor Counter : 177


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri