पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी आयआयएससी बंगळुरू येथे मेंदू संबंधी संशोधन केंद्राचे उद्‌घाटन केले आणि बागची पार्थसारथी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची पायाभरणी केली

प्रविष्टि तिथि: 20 JUN 2022 3:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जून 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयआयएससी बंगळुरू  येथे मेंदू संबंधी संशोधन केंद्राचे उद्‌घाटन केले आणि बागची पार्थसारथी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची पायाभरणी केली.

पंतप्रधान ट्विट संदेशात म्हणाले :

@iiscbangalore येथे मेंदू संबंधी संशोधन केंद्राचे उद्घाटन करताना आनंद झाला. या प्रकल्पाची पायाभरणी करण्याचा मानही मला मिळाला होता , त्यामुळे अधिक आनंद झाला आहे. मेंदूशी संबंधित विकारांचे व्यवस्थापन कसे करायचे यावर प्रामुख्याने   संशोधन केले जाईल.

ज्या वेळी प्रत्येक राष्ट्राने आरोग्यसेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, अशा वेळी बागची पार्थसारथी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासारखे  प्रयत्न खूप महत्त्वाचे ठरतात.  आगामी काळात, यामुळे आरोग्य सेवा क्षमता अधिक मजबूत होईल आणि या क्षेत्रात अग्रगण्य संशोधनाला  प्रोत्साहन मिळेल.

मेंदूवरील संशोधन केंद्र हे एक प्रकारची विशिष्ट संशोधन सुविधा म्हणून विकसित केले असून  वयानुरूप होणाऱ्या मेंदूच्या  विकारांचे व्यवस्थापन करण्यासाठी पुरावा आधारित सार्वजनिक आरोग्य उपचार पुरवण्यासाठी महत्त्वपूर्ण संशोधन करण्यावर भर देते.आयआयएससी बंगळुरू  संकुलात 832 खाटांचे बागची पार्थसारथी मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारले जाणार आहे आणि प्रतिष्ठित संस्थेत विज्ञान, अभियांत्रिकी आणि वैद्यकशास्त्र अभ्यासक्रमांना एकत्र जोडण्यात मदत करेल. यामुळे देशात क्लिनिकल  संशोधनाला मोठी चालना मिळेल  आणि नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याच्या दिशेने काम करेल ज्यामुळे देशातील आरोग्य सेवा सुधारण्यास मदत होईल.

 

  

S.Patil/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1835519) आगंतुक पटल : 270
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam