आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

गुजरातमधील केवडीयातील स्टॅच्यू ऑफ युनिटी इथल्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्याचे 21 जून 2022 रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया करणार नेतृत्व


आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या राष्ट्रव्यापी कार्यक्रमांसाठी 75 प्रतिष्ठित स्थळांपैकी एक म्हणून स्टॅच्यू ऑफ युनिटीची निवड

Posted On: 18 JUN 2022 8:45PM by PIB Mumbai

 

आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, कर्नाटकातील म्हैसूर इथल्या, म्हैसूर पॅलेस येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी योग दिनाच्या कार्यक्रमाचे नेतृत्व करतील. माननीय पंतप्रधानांचे भाषण डीडी नॅशनल आणि इतर डीडी वाहिन्यांवर सकाळी 6:40 ते 7:00 या वेळेत थेट प्रसारित केले जाईल. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आधीच्या सर्व कार्यक्रमांची क्षणचित्रे आणि कामगिरी दाखवण्यासाठी म्हैसूर येथे डिजिटल योग प्रदर्शन आयोजित केले जाईल. या प्रदर्शनात योगचे सामर्थ्य, सर्वोत्तम सराव, संशोधनातील ठळक मुद्दे, योग नियम इत्यादींचाही समावेश असेल.

देश स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करत असताना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमांसाठी 75 प्रतिष्ठित स्थळांची निवड करण्यात आली आहे.  गुजरातमधील केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी हे  त्यापैकीच एक. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया, 21 जून 2022 रोजी गुजरातमधील केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे  योग सोहळ्याचे नेतृत्व करतील.

आंतरराष्ट्रीय योग दिवस  दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो.  या वर्षी, 'मानवतेसाठी योग' या संकल्पनेवर आधारित आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस भारतात आणि जगभरात आयोजित केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, मन की बात कार्यक्रमात याची घोषणा केली होती. 

आपल्या प्रतिष्ठित स्थळांचे प्रदर्शन घडवत  'भारताची नाममुद्रा जागतिक स्तरावर' यावर लक्ष केंद्रित केले जाईल. आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रम कॉमन योगा प्रोटोकॉल (सीवायपी) या 45 मिनिटांच्या प्रोटोकॉलच्या सामंजस्यपूर्ण सामूहिक योग प्रात्यक्षिकावर आधारित आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002WF2B.jpg

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003SUOF.jpg

यावर्षी, आंतरराष्ट्रीय योग दिनाचे  प्रमुख आकर्षण गार्जियन   रिंगअसेल. याद्वारे जगभरात होत असलेल्या योग सोहळ्यांचा दिवसभर प्रसार केला जाईल. द गार्जियन रिंग एक सूर्य, एक पृथ्वी ही संकल्पना अधोरेखित करते आणि योगची एकत्रित शक्ती दर्शवते. हा उपक्रम परदेशातील विविध कार्यक्रमांचे प्रसारण एकत्रित करेल. त्याचे डीडी इंडियावर थेट प्रसारण केले जाईल.

सर्वांनी यात सहभागी व्हावे आणि योगचा लाभ घ्यावा असे आवाहन करत पंतप्रधानांनी अनेक ट्विट सामायिक केले आहेत. गेल्या काही वर्षांत योग जागतिक स्तरावर खूप लोकप्रिय झाला आहे. सर्व स्तरातील आणि व्यवसायातील लोकांनी त्यांच्या दैनंदिन दिनक्रमात त्याचा समावेश केला आहे. कारण योगमुळे त्यांना निरोगी जीवनशैली विकसित करण्यास मदत झाली आहे, असे त्यांनी आपल्या ट्विट संदेशात नमूद केले आहे.

नियमितपणे योगाभ्यास करण्याच्या आरोग्यदायी सवयीला प्रोत्साहन देत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी ट्विट केले. आजार टाळण्यासाठी आणि आनंद मिळविण्यासाठी, निरोगीपणावर लक्ष केंद्रित करणे खूप महत्वाचे आहे.  त्यासाठी प्रत्येकाने योगासने हा आपल्या जीवनाचा भाग बनवला पाहिजे असे त्यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004RTKW.jpg

पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस

21 जून 2015 रोजी साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्र संघाने 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून मान्यता देण्यामागचा मुख्य उद्देश, जागतिक स्तरावर सार्वजनिक आरोग्यामध्ये योगची क्षमता अधोरेखित करणे हा होता.  डिसेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेचा (यूएनजीए) आंतरराष्ट्रीय योग दिवस ठराव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने मांडला गेला आणि एकमताने मंजूर करण्यात आला.  2015 पासून, आंतरराष्ट्रीय योग दिवस हा जगभरातील आरोग्यासाठीची मोठी चळवळच झाला आहे.

***

S.Kakade/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1835146) Visitor Counter : 149


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu