नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नौवहन मंत्रालयाने भारतीय नौदलातील अग्निवीरांना मर्चंट नेव्हीमध्ये सुरळीत प्रवेश मिळावा यासाठी सहा आकर्षक सेवा संधी जाहीर केल्या आहेत


अग्निवीरांना प्रवीण करण्यासाठी मंत्रालय भारतीय नौदलासोबत काम करणार

मर्चंट नेव्हीमध्ये सक्षम भूमिका बजावता यावी यासाठी युवांना भारतीय नौदलाच्या माध्यमातून अग्निपथ योजना प्रशिक्षण पुरवणार

Posted On: 18 JUN 2022 7:58PM by PIB Mumbai

 

बंदरे, नौवहन  आणि जलमार्ग मंत्रालयाने अग्निवीरांना  भारतीय नौदलातील कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर  मर्चंट नेव्हीमध्ये  विविध जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी  सहा आकर्षक सेवा संधींची घोषणा केली आहे. या योजनेमुळे अग्निवीरांना जगभरातील मर्चंट नेव्हीतील संधींचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रशिक्षणनौदलाचा समृद्ध अनुभव आणि व्यावसायिक प्रमाणपत्र मिळवता येईल.  बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या नौवहन  महासंचालनालयाने आज मुंबईत या तरतुदी जाहीर केल्या.

अग्निवीरांसाठीच्या या योजनांमध्ये भारतीय नौदलातील रेटिंगकडून मर्चंट नेव्हीमधील प्रमाणित रेटिंगमधील बदल  समाविष्ट आहे. भारतीय नौदलाच्या माध्यमातून वरीलपैकी कोणत्याही योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या अग्निवीरांसाठी नौवहन मंत्रालय  INDOS आणि CDC जारी करेल.  मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल शाखेत आयटीआय  ट्रेड सर्टिफिकेट प्राप्त  अग्निवीरांसाठी विद्यमान पात्रतेसह सामील होण्याची  किंवा भारतीय नौदलातील त्यांच्या कार्यकाळात कौशल्य प्राप्त करण्यासह काही योजनांची पुनर्रचना केली आहे .

अग्निपथ योजना - भारताच्या सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण करण्यासाठीचा  परिवर्तनात्मक निर्णय देशाच्या तरुणांना देशसेवेसाठी संधी निर्माण करेल आणि त्याच वेळी या संधींचा लाभ  घेण्यासाठी त्यांना समृद्ध  व्यावसायिक अनुभव आणि प्रशिक्षण मिळवून देईल. जागतिक स्तरावर मर्चंट नेव्हीत काम करण्यासाठीअग्निवीरांना प्रशिक्षित आणि सुसज्ज बनवण्यासाठी तसेच नौदलामध्ये चार वर्षांच्या कार्यकाळानंतर मर्चंट पदावर पर्यायी कारकीर्द सुरु करण्याच्या दृष्टीने नौवहन मंत्रालय भारतीय नौदलासोबत काम करेल.

या योजनेबाबत बोलताना, केंद्रीय बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्री  सर्बानंद सोनोवाल म्हणाले, परिवर्तनात्मक अग्निपथ योजनेच्या माध्यमातून भारतीय सशस्त्र दलांना तरुण ठेवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे. या कार्यकाळात नवीन तंत्रज्ञानाशी ते जुळवून घेतील आणि आपल्या जागतिक दर्जाच्या भारतीय नौदलाच्या माध्यमातून जागतिक मर्चंट नेव्हीमध्ये उत्तम  करिअर घडवण्यासाठी  त्यांना तयार केले जाईल.  या योजनांद्वारे मर्चंट नेव्हीतील  कुशल मनुष्यबळातील तफावत दूर करण्यासाठी आम्ही भारतीय नौदलासोबत काम करत आहोत.यामुळे आपल्या अग्निवीरांना नौवहन क्षेत्रात प्रवेश करता येईल आणि समृद्ध कौशल्य आणि अनुभवाद्वारे भारतीय सागरी अर्थव्यवस्थेत भरीव योगदान देऊन  मर्चंट नेव्हीमध्ये एक उत्तम  करिअर घडवण्यात  मदत करेल.

जागतिक स्तरावर मर्चंट नेव्हीसाठी   भारत  सर्वाधिक  मनुष्यबळ पुरवणाऱ्या देशांपैकी एक आहे.  भारतीय खलाशी एसटीसीडब्ल्यू  कन्व्हेन्शननुसार प्रमाणित असून  त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी आहे. या योजना अग्निवीरांना नौवहन  क्षेत्रात सामावून घेण्यासाठी  मदत करण्यासाठी तयार केल्या आहेत. यासाठी नौवहन मंत्रालय आणि भारतीय नौदल एकत्रितपणे काम करतील.

***

S.Kakade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1835139) Visitor Counter : 187