भूविज्ञान मंत्रालय

नॅशनल सेंटर फॉर मिडियम रेंज वेदर फोरकास्टिंग आणि भारतीय नौदल यांच्यात न्यूमरिकल मॉडेलवर आधारित ऍप्लिकेशन्ससंदर्भात सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करारावर झाली स्वाक्षरी

Posted On: 17 JUN 2022 9:30PM by PIB Mumbai

 

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या,नॅशनल सेंटर फॉर मिडियम रेंज वेदर फोरकास्टिंग (NCMRWF), विभागानेभारतीय नौदल,संरक्षण मंत्रालय, यांच्या सोबत 'हवामानशास्त्र आणि समुद्रशास्त्रातील न्यूमरिकल मॉडेलवर आधारित  ऍप्लिकेशन्ससंदर्भात सहकार्य करण्यासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.नॅशनल सेंटर फॉर मिडियम रेंज वेदर फोरकास्टिंगच्या (NCMRWF), नोएडा येथे झालेल्या समारंभात भारतीय नौदलाच्या नौदल महासागरशास्त्र आणि हवामानशास्त्र संचालनालयाचे प्रमुख डॉ. आशिष के. मित्रा, आणि संरक्षण मंत्रालयाच्या एकात्मिक मुख्यालयाचे (नौदल) प्रमुख (DNOM), कमोडोर जी रामबाबू यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

या सहकार्याचा उद्देश दोन्ही संस्थांना हवामान/ महासागर क्षेत्रात होणाऱ्या बदलांची मॉडेल तयार करणे, कपल्ड मॉडेलिंग,माहितीचे एकत्रीकरण, एकत्रितपणे अंदाज देणे आणि उपग्रहाद्वारे मिळणाऱ्या माहितीचा वापर करणे हा आहे. याशिवाय या दोन्ही संस्थांच्या व्यावसायिक सामर्थ्याचा उपयोग करून कौशल्य विकसित करत सामायिक करणे हा देखील याचा उद्देश आहे.

उच्च कुशल शास्त्रज्ञ आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधांसह),नॅशनल सेंटर फॉर मिडियम रेंज वेदर फोरकास्टिंग (NCMRWF) कोची येथील भारतीय नौदलाच्या दोन प्रमुख आस्थापनांना, म्हणजेच नेव्हल ऑपरेशन्स डेटा प्रोसेसिंग अँड अॅनालिसिस सेंटर (NODPAC) आणि इंडियन नेव्हल मिटरोलॉजिकल अॅनालिसिस सेंटर (INMAC) यांना हिंद महासागर क्षेत्र (IOR) आणि इतर जागतिक क्षेत्रांमध्ये विश्वासार्हता आणि कपल्ड माॅडेल्ससह अचूकतेने प्रगत संख्यात्मक हवामान अंदाज व्यक्त करण्यात ही प्रणाली मदत करेल.

या सामंजस्य करारामुळे नॅशनल सेंटर फॉर मिडियम रेंज वेदर फोरकास्टिंग (NCMRWF) आणि भारतीय नौदल या दोघांनाही भविष्यात अर्थपूर्ण संवाद आणि व्यावसायिक देवाणघेवाण करण्यासाठी फायदा होईल.

नॅशनल सेंटर फॉर मिडियम रेंज वेदर फोरकास्टिंग प्रमुख (NCMRWF)डॉ. आशिष के. मित्रा, आणि कमोडोर जी. रामबाबू, प्रमुख (DNOM), भारतीय नौदल यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

***

S.Patil/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1834919) Visitor Counter : 160


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi