मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
गुजरातमधील विशेष महत्त्वाच्या स्थानावर आयोजित योगोत्सवात मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांचा सहभाग
आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाची उलटगणना सुरू
Posted On:
17 JUN 2022 9:10PM by PIB Mumbai
भारत सरकारच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे, त्याचाच एक भाग म्हणून, आयुष मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय योग दिवस (IDY) च्या उलट गणतीचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला. पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ (एनडीडीबी) आणि गुजरात सहकारी दूध विपणन महासंघ (GCMMF) यांच्या सहकार्याने IDY-2022 योगोत्सवासाठी उलटगणती कार्यक्रम गुजरातमध्ये सोमनाथ येथे साजरा केला. योग्य राहणीमान आणि पौष्टिक आहारासह योग हा योगोत्सवाचा मुख्य विषय यावेळी ठेवण्यात आला.
या योगोत्सवाला मार्गदर्शन करताना, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला म्हणाले की, योग हा आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा अविभाज्य भाग असल्याने जगभरात ‘योग’ला मिळणारी मान्यता ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. व्यक्तीला केवळ व्यायाम (योगद्वारे) नाही तर सकस आणि पौष्टिक आहाराचीही गरज असते. दूध हे सर्व अत्यावश्यक पोषक तत्वांचा एक चांगला स्त्रोत आहे आणि जवळजवळ पूर्ण अन्न आहे, हे सिद्ध झाले आहे. यावेळी मंत्री रूपाला यांच्या हस्ते गोबर गॅस स्लरी आधारित सेंद्रिय खत आणि NDDB ने विकसित केलेले शिशु संजीवनी (सुपोषण संच) वितरित करण्यात आले.
अरबी समुद्रात मावळत्या सूर्याच्या साक्षीने सोमनाथ मंदिराच्या प्रांगणामध्ये या योगोत्सवाचे आयोजन आज करण्यात आले होते. जुनागढ, अमरेली, गीर, सोमनाथ आणि राजकोट येथील हजारांहून अधिक दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसह केंद्रीय मंत्री योग सत्रात सहभागी झाले होते. देशभरातील विविध सहकारी आणि दूध उत्पादक कंपन्यांमधील 7 लाखांहून अधिक दुग्ध उत्पादक शेतक-यांनी योगोत्सवामध्ये आभासी पद्धतीने सहभाग घेतला आणि योगाभ्यास केला.
***
S.Patil/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1834916)
Visitor Counter : 187