आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 195.84 कोटी मात्रांचा टप्पा पार केला


12 ते 14 वर्षे वयोगटातील 3.55 कोटींहून जास्त किशोरांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 63,063.

गेल्या 24 तासात आढळले 12,847 नवे रुग्ण.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.64%

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 2.41%

Posted On: 17 JUN 2022 9:49AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 195. 84 कोटी (1,95,84,03,471) मात्रांचा टप्पा पार केला. 2,52,19,258 सत्रांमधून लसीकरणचा हा टप्पा गाठण्यात आला.

 

देशातील 12 ते 14 वर्षे वयोगटातील किशोरांना कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिम 16 मार्च 2022 रोजी सुरू झाली. आतापर्यंत 3.55 कोटीहून जास्त (3,55,35,122) किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे 10 एप्रिल 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,08,105

2nd Dose

1,00,54,119

Precaution Dose

54,85,219

FLWs

1st Dose

1,84,21,416

2nd Dose

1,76,08,144

Precaution Dose

94,55,174

Age Group 12-14 years

1st Dose

3,55,35,122

2nd Dose

2,05,09,617

Age Group 15-18 years

1st Dose

6,00,15,573

2nd Dose

4,74,73,183

Age Group 18-44 years

1st Dose

55,78,09,521

2nd Dose

49,68,63,825

Precaution Dose

17,97,271

Age Group 45-59 years

1st Dose

20,33,72,120

2nd Dose

19,24,30,998

Precaution Dose

19,82,335

Over 60 years

1st Dose

12,71,93,226

2nd Dose

12,01,23,664

Precaution Dose

2,18,64,839

Precaution Dose

4,05,84,838

Total

1,95,84,03,471

 

भारतातील उपचाराधीन रुग्णसंख्या सध्या 63,063 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.15% इतकी आहे.

 

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.64% झाला आहे. गेल्या 24 तासात 7,985 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,26,82,697 झाली आहे.

गेल्या 24 तासात 12,847 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले.

गेल्या 24 तासात एकूण 5,19,903 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 85.69 कोटींहून अधिक (85,69,10,352) चाचण्या केल्या आहेत.

देशाचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.41 % तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.47 % आहे.

 

***

STupe/S.Mukhedkar/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1834736) Visitor Counter : 174