रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

परिसंस्था, पर्यावरण आणि विकास यांच्यात समतोल राखायला हवा: नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

Posted On: 16 JUN 2022 2:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 जून 2022

 

परिसंस्था, पर्यावरण आणि विकास यांच्यात समतोल राखण्यावर भर द्यायला हवा,असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

‘इंडस्ट्रियल डिकार्बोनायझेशन समिट 2022’(IDS-2022)-2070 पर्यंत कार्बन न्यूट्रॅलिटीसाठी आराखडा संबंधी परिषदेचे उदघाटन करताना ते म्हणाले की, विजेच्या कमतरतेवर मात करण्यासाठी पर्यायी इंधन विकसित करणे आवश्यक आहे.या मुद्द्यांवर विकेंद्रित एकतर्फी दृष्टिकोन देशासाठी लाभदायक नाही, असे गडकरी यावेळी पुढे म्हणाले.

"आगामी काळात आपल्याला आपली अर्थव्यवस्था मजबूत करायची आहे आणि त्याचबरोबर पर्यावरणाचेही संरक्षण करायचे आहे, असे गडकरी म्हणाले.  ते म्हणाले, की ग्रीन हायड्रोजनला आमचे प्राधान्य आहे, जैवतंत्रज्ञानाचा वापर करून आपण बायोमासची उत्पादकता वाढवू शकतो आणि बायोमास वापरून आपण बायो-इथेनॉल, बायो-एलएनजी आणि बायो-सीएनजी निर्माण करू शकतो.  मिथेनॉल आणि इथेनॉलच्या वापराने प्रदूषण कमी होईल,असेही त्यांनी नमूद केले. गडकरी म्हणाले, की एक केंद्रित आराखडा तयार केला पाहिजे आणि पुरेसे  संशोधन केले पाहिजे जेणेकरून आपल्याला आपली आयात कमी करून निर्यात वाढवता येईल.

या संदर्भात सविस्तर माहितीसाठी पुढील संकेतस्थळाच्या लिंकवर क्लिक करून संपूर्ण तपशील पहा.

 

 

S.Kane/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1834496) Visitor Counter : 231