गृह मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 'अग्निपथ योजने'च्या संदर्भात, केंद्रीय गृह मंत्रालयाने सीएपीएफ आणि आसाम रायफल्समध्ये भर्तीसाठी या योजनेअंतर्गत चार वर्षे पूर्ण केलेल्या 'अग्निवीरांना' प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे
सीएपीएफ आणि आसाम रायफल्समध्ये भर्तीसाठी या योजनेंतर्गत चार वर्षे पूर्ण केलेल्या अग्निवीरांना प्राधान्य देण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे
गृह मंत्रालयाच्या या निर्णयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अग्निपथ योजने’अंतर्गत प्रशिक्षित युवक राष्ट्रसेवा आणि सुरक्षेत योगदान देऊ शकतील, या निर्णयाच्या आधारे विस्तृत योजना तयार करण्याचे काम सुरु झाले आहे
Posted On:
15 JUN 2022 3:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जून 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 'अग्निपथ योजने'च्या अनुषंगाने , केंद्रीय गृह मंत्रालयाने सीएपीएफ आणि आसाम रायफल्समध्ये भर्तीसाठी या योजनेअंतर्गत चार वर्षे पूर्ण केलेल्या 'अग्निवीरांना' प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय गृहमंत्री कार्यालयाने ट्विट संदेशात म्हटले आहे की, "अग्निपथ योजना' हा तरुणांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने नरेंद्र मोदी यांचा दूरदर्शी आणि स्वागतार्ह निर्णय आहे. या संदर्भात, गृह मंत्रालयाने सीएपीएफ आणि आसाम रायफल्समध्ये भर्तीसाठी या योजनेअंतर्गत चार वर्षे पूर्ण केलेल्या 'अग्निवीरांना' प्राधान्य देण्याचा निर्णय आज घेतला आहे.
केंद्रीय गृहमंत्री कार्यालयाने म्हटले आहे की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गृह मंत्रालयाच्या या निर्णयामुळे, 'अग्निपथ योजने' अंतर्गत प्रशिक्षण घेतलेले युवक राष्ट्रसेवा आणि सुरक्षेत योगदान देऊ शकतील. आजच्या निर्णयाच्या आधारे विस्तृत योजना तयार करण्याचे काम सुरु झाले आहे.
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1834231)
Visitor Counter : 332