PIB Backgrounder
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
प्रविष्टि तिथि:
13 JUN 2022 8:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई 13 जून 2022


- 195.19 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
4
- India's Active caseload currently stands at 47,995
- Active cases stand at 0.11%
- Recovery Rate currently at 98.68%
- 4,592 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to
- 4,26,57,335
- 8,084 new cases recorded in the last 24 hours
- Daily positivity rate (3.24%)
- Weekly Positivity Rate (2.21%)
- 85.51 cr Total Tests conducted so far; 2,49,418 tests conducted in the last 24 hours
|
#Unite2FightCorona #IndiaFightsCorona


आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 195 कोटी 19 लाखांचा (1,95,19,81,150) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 2,50,56,366 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.
16 मार्च 2022 रोजी देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 3 कोटी 51 लाखांहून अधिक (3,51,48,286) किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022 सुरु करण्यात आले आहे.
भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता 47,995 इतकी आहे, देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही सख्या केवळ 0.11% आहे.
परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.68% झाला आहे. गेल्या 24 तासात 4,592 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,26,57,335 झाली आहे.
गेल्या 24 तासात, देशात नव्या 8,084 कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासात देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 2,49,418 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 85 कोटी 51 लाखांहून अधिक (85,51,08,879) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.21% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 3.24%.इतका नोंदला गेला आहे.
इतर अपडेट्स :
N.Chitale/ P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1833639)
आगंतुक पटल : 214