आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकत्रित कोविड-19 लसीकरणाने पार केला 195.07 कोटीचा टप्पा


12 ते 14 वयोगटातील मुलांना दिल्या पहिल्या लसीच्या 3.51 कोटी हून अधिक मात्रा

भारताची सध्याची उपचाराधीन रुग्णसंख्या 44,513

गेल्या 24 तासांत 8,582 नवीन रूग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.68%

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 2.02%

Posted On: 12 JUN 2022 4:53PM by PIB Mumbai

 

आज सकाळी सात वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताची कोविड-19 लसीकरणाची व्याप्ती 195.07 कोटीहून अधिक (1,95,07,08,541) पर्यंत पोहचली आहे. 2,50,27,810 सत्रांच्या माध्यमातून हे यश साध्य करण्यात आले आहे.

12 ते 14 वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 पासून कोविड-19 विरोधी लसीकरण सुरू झाले. आतापर्यंत, 3.51 कोटी (3,51,25,475) हून अधिक पौगंडावस्थेतील मुलामुलींना कोविड-19 विरोधी लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, 18 ते 59 वयोगटातील लोकांना  कोविड-19 खबरदारीचा डोस देण्यास 10 एप्रिल 2022 रोजी सुरूवात झाली.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार आलेला एकत्रित आकडेवारी खालीलप्रमाणे :

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,07,629

2nd Dose

1,00,47,849

Precaution Dose

53,94,599

FLWs

1st Dose

1,84,20,530

2nd Dose

1,75,97,387

Precaution Dose

91,75,776

Age Group 12-14 years

1st Dose

3,51,25,475

2nd Dose

1,93,93,200

Age Group 15-18 years

1st Dose

5,98,50,178

2nd Dose

4,69,54,612

Age Group 18-44 years

1st Dose

55,75,74,594

2nd Dose

49,45,34,653

Precaution Dose

15,02,570

Age Group 45-59 years

1st Dose

20,33,20,935

2nd Dose

19,18,43,932

Precaution Dose

18,05,805

Over 60 years

1st Dose

12,71,50,503

2nd Dose

11,97,18,742

Precaution Dose

2,08,89,572

Precaution Dose

3,87,68,322

Total

1,95,07,08,541

 

भारतात सध्या उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 44,513 इतकी असून अशा रूग्णांची संख्या देशातील एकूण पॉझिटिव्ह रूग्णांच्या 0.10% इतकी आहे.

परिणामी, भारताचा कोविडमधून रूग्ण  बरे होण्याचा दर 98.68% इतका आहे. गेल्या 24 तासात,  4,435 रूग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रूग्णांची एकत्रित संख्या (कोरोना महासाथ सुरू झाल्यापासून) सध्या 4,26,52,743 इतकी आहे.

गेल्या 24 तासात 8,582 नवीन रूग्णांची नोंद देशभरात झाली आहे.

गेल्या 24 तासातएकूण 3,16,179  इतक्या कोविड-19 चाचण्या करण्यात आल्या असून भारताने आतापर्यंत 85.48 कोटी (85,48,59,461)  इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्याच्या घडीला 2.02% इतका असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.71% असल्याची नोंद झाली आहे.

***

S.Tupe/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1833294) Visitor Counter : 177