संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ राजनाथ सिंह यांनी व्हिएतनाम दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी व्हिएतनामच्या प्रशिक्षण संस्थांना दिली भेट
भाषा आणि माहिती तंत्रज्ञान प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी न्हा ट्रांग येथील हवाई दल अधिकारी प्रशिक्षण केंद्राला दहा लाख डॉलर्सचे सहाय्य प्रदान
प्रविष्टि तिथि:
10 JUN 2022 2:43PM by PIB Mumbai
व्हिएतनाम या दक्षिणपूर्व आशियाई देशाच्या तीन दिवसीय अधिकृत दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 10 जून 2022 रोजी व्हिएतनामच्या प्रशिक्षण संस्थांना भेट दिली. उभय देशांमधील संरक्षण सहकार्य वाढवण्याच्या अनुषंगाने, व्हिएतनाम दौऱ्यावर असलेल्या राजनाथ सिंह यांनी न्हा ट्रांग येथील हवाई दल अधिकारी प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन आपल्या दिवसभराच्या कार्यक्रमांची सुरुवात केली. या केंद्रात भाषा आणि माहिती तंत्रज्ञान प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी त्यांनी भारत सरकारच्या वतीने दहा लाख डॉलर्सचे सहाय्य प्रदान केले. व्हिएतनामच्या हवाई संरक्षण आणि हवाई दलाच्या कर्मचार्यांची भाषा आणि माहिती तंत्रज्ञान कौशल्ये अधिक बळकट करण्यासाठी प्रयोगशाळा महत्त्वपूर्ण योगदान देईल, अशी अपेक्षा त्यांनी या केंद्रातील कर्मचाऱ्यांना संबोधित करताना व्यक्त केली.
यानंतर ,राजनाथ सिंह यांनी न्हा ट्रांग येथील दूरसंचार विद्यापीठाला भेट दिली, या विद्यापीठात भारत सरकारने दिलेल्या 50 लाख अमेरिकी डॉलर्सच्या साहाय्याने आर्मी सॉफ्टवेअर पार्कची स्थापना केली जात आहे.सप्टेंबर 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिएतनाम दौऱ्यादरम्यान या आर्थिक सहाय्याची घोषणा करण्यात आली होती.
व्हिएतनामच्या दौऱ्यात, संरक्षणमंत्र्यांनी राष्ट्रीय संरक्षण मंत्री जनरल फान व्हॅन गिआंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली आणि व्हिएतनामचे राष्ट्रपती गुयेन झुआन फुक आणि पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह यांची भेट घेतली.
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1831981
09 जून 2022 रोजी, श्री राजनाथ सिंह यांनी हे फोंग येथील हाँग हा या जहाज बांधणी कारखान्याला दिलेल्या भेटी दरम्यान व्हिएतनामला 12 अतिवेगवान संरक्षक नौका सुपूर्द केल्या.व्हिएतनामला भारत सरकारने प्रदान केलेल्या 10 कोटी अमेरिकी डॉलर्स संरक्षण कर्जसहाय्या अंतर्गत या या नौकांची बांधणी करण्यात आली आहे.
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1832495
***
S.Patil/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1832857)
आगंतुक पटल : 268