वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
पंतप्रधान गती शक्ती योजनेच्या उदाहरणाचे येत्या काही वर्षांत जग करेल अनुकरण: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल
Posted On:
07 JUN 2022 2:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जून 2022
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल, म्हणाले की, येत्या काही वर्षांत संपूर्ण विश्व पंतप्रधान गति शक्तीच्या उदाहरणाचे अनुकरण करेल.ज्या लोकांना औद्योगिक युनिट्सची सुरुवात करायची आहे, त्यांनी या योजनेचा यथायोग्य उपयोग करावा, असे सूचित करत त्यांनी सांगितले, की पीएम गति शक्ती ही योजना परीवर्तन घडवून आणेल.ते आज कोची येथे राष्ट्रीय औद्योगिक क्षेत्रीय विकास कार्यक्रम आयोग(एनआयसीडीसी, नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्राम) यांच्या वतीने आयोजित गुंतवणूकदारांच्या एका गोलमेज परिषदेला संबोधित करत होते.
केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी गुंतवणूकदारांना केरळ राज्यातील नैसर्गिक वातावरणाचा उद्योग उभारणीसाठी वापर करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, केंद्र सरकारचा उद्देश व्यवसाय सुलभता आणणे आणि उचित खर्च करून उद्योग उभारणे, हा आहे.ते पुढे म्हणाले की, या बाबतीत पंतप्रधानांचे लक्ष्य स्पष्ट आहे. पीयूष गोयल म्हणाले की, मोदी सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सरकार सुशासनाच्या संदेशाचा प्रसार करत होते.
केरळ सरकारचे उद्योग मंत्री पी. राजीव यांनी आपल्या भाषणात सांगितले, की वर्षभरात एक लाख उद्योग स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. बेंगळुरू-कोची इंडस्ट्रियल कॉरिडॉर तिरुअनंतपुरमपर्यंत वाढवण्याची विनंतीही त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना यावेळी केली. यावेळी औद्योगिक नीती आणि संवर्धन विभागाचे (DPIIT) सहसचिव, श्री. राजेंद्र रत्नू, व्यवस्थापकीय संचालक केरळ औद्योगिक संरचना विकास आयोग, (KINFRA), संतोष कोशी थॉमस, प्रधान सचिव, केरळ सरकार, सुमन बिल्ला, उपाध्यक्ष, राष्ट्रीय औद्योगिक क्षेत्रीय विकास कार्यक्रम आयोग(एनआयसीडीसी, NICDC) अभिषेक चौधरी, यांचीही यावेळी भाषणे झाली.
* * *
S.Thakur/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1831814)
Visitor Counter : 217