आदिवासी विकास मंत्रालय

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह उद्या नवी दिल्ली येथे राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्थेचे उद्‌घाटन करणार

Posted On: 06 JUN 2022 3:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जून 2022

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्या नवी दिल्ली येथे राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्थेचे उद्‌घाटन होणार आहे. आदिवासी व्यवहार मंत्रालयानं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

National Tribal Research Institute-NTRI अर्थात राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्था ही राष्ट्रीय स्तरावरील एक प्रमुख संस्था असेल. शैक्षणिक, कार्यकारी आणि विधान क्षेत्रातील आदिवासींच्या चिंता, समस्या आणि इतर गोष्टींसाठी ही संस्था एक मध्यवर्ती केंद्र बनेल. नामांकित विद्यापीठे, संस्था तसेच शैक्षणिक संस्था आणि संसाधन केंद्रे यांच्याशी ही संशोधन संस्था सहयोग करेल. ही आदिवासी संशोधन संस्था सेंटर्स ऑफ एक्सलन्स (CoEs), NFS च्या संशोधन विद्वानांच्या प्रकल्पांचे निरीक्षण करेल आणि संशोधन तसेच प्रशिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी नियम तयार करेल. आदिवासी व्यवहार मंत्रालय तसेच राज्य कल्याण विभागांना धोरणात्मक इनपुट प्रदान करणे, आदिवासी जीवनशैलीच्या सामाजिक-आर्थिक पैलूंमध्ये सुधारणा किंवा समर्थन करणारे डिझाइन अभ्यास आणि कार्यक्रम, PMAAGY चा डेटाबेस तयार करणे आणि त्याची देखभाल करणे हे या संस्थेचे इतर उपक्रम असतील. आदिवासी संग्रहालये चालवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे आणि भारतातील समृद्ध आदिवासी सांस्कृतिक वारसा एकाच छताखाली आणणे हे कामही ही संस्था करणार आहे.

 आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा, इतर कॅबिनेट आणि राज्य मंत्र्यांसह कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू, आदिवासी व्यवहार राज्यमंत्री रेणुका सिंह सरुता, आदिवासी व्यवहार राज्यमंत्री बिश्वेश्वर तुडू, अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉन बारला, ग्रामीण विकास आणि पोलाद राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील आदिवासी व्यवहार मंत्रालयाने केलेल्या कामगिरीचे दर्शन घडवणारे प्रदर्शन यावेळी भरवले जाणार आहे. त्यात देशभरातील 100 हून अधिक आदिवासी कारागीर आणि आदिवासी नृत्य मंडळे त्यांची स्वदेशी उत्पादने दाखवतील. हा कार्यक्रम फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाईव्ह-स्ट्रीम केला जाईल. दुपारी दोन वाजल्यापासून हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार असून सायंकाळी सहा वाजता आदिवासी मंडळी नृत्य सादर करतील.

 

 

 

S.Kane/P.Jambhekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1831545) Visitor Counter : 163